प्रतिनिधी:समीर गोरडे
आंबेगाव तालुक्यातील कळंब, चास, कोकणे चिंचोली रस्त्यावर
खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दिवसभरात या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची
वाहतूक होत आहे तसेच हा रस्ता घोडेगाव भिमाशंकरसाठी सोयीचे असल्याने वाहनांची वाहतूकही
मोठी प्रमाणात होते. साकोरे नजीक या रस्त्याची चाळण मोठ्या
प्रमाणात झाली आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यासाठी
मोठ्या प्रमाणात निधी पडतो, परंतु ठेकेदारांकडून रस्त्याचा कामाचा दर्जा राखला जात
नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्याची दयनीय अवस्था होती कळंब चास चिंचोली को
हा रस्ता साधारण २० किमी अंतर आहे अनेक ठिकाणी हा रस्ता खड्यात गेल्याने या
रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात होत आहे तसेच ठेकेदारांनी रस्त्याचे काम करताना
पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेने जाण्याची व्यवस्था न केल्याने सर्व पाणी रस्त्यावर
येत आहे त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरुन प्रवास करणे धोकादायक झाले आहे
संबधित विभागाने कळंब चास रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी व वाहन चालकांकडून होत आहे.