मंचर प्रतिनिधी:
पेठ
गावच्या हद्दीत अन्नपूर्णा हॉटेल जवळ पुणे नाशिक हायवे रोडवर विलास पांडुरंग चासकर
(वय.३७ वर्ष) रा.पेठ, ता.आंबेगाव, जि.पुणे या व्यक्तीचा अपघातात
जागीच मृत्यू झाला आहे.याप्रकरणी विनायक पांडुरंग चासकर (वय.३३ वर्ष) मयत इसमाच्या भावाने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद
दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २१ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पेठ येथे अन्नपूर्णा हॉटेलजवळ नाशिक पुणे हायवे रोडवर अपघातामध्ये फिर्यादी यांचा मोठा भाऊ विलास पांडुरंग चासकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सदर व्यक्ती हे त्याची स्वतःची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल एम.एच.१४ बी.जे.५०३१ वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव गाडी चालवत होते. याकारणाने मोटार सायकल स्लिप झाली.गाडी स्लिप झाल्याने विलास चासकर खाली पडले त्यामुळे डोक्यास आणि तोंडास किरकोळ व गंभीर दुखापत झाली.ह्या झालेल्या अपघातामध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मोटार सायकलचेही किरकोळ नुकसान झाले आहे.सदर नुकसानीस आणि मृत्यूस स्वतः जबाबदार आहे.अशी फिर्याद फिर्यादी मयत व्यक्तीचे भाऊ विनायक चासकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली.
पुढील तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.