प्रतिनिधी:समीर गोरडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमळा शिंगवे येथे सेवानिवृत्त ACP पंढरीनाथ वाव्हळ यांनी भेट देऊन शाळेच्या झालेल्या कामाची पाहणी केली. साहेबांना तीन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना वर्गातील फरशी अभावी बसण्यासाठी होत असलेली गैरसोय लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी दिलेल्या सुमारे ७०००० रु .निधीतून शाळेच्या वर्गखोल्यांची व शालेय वर्हांडा यासाठी बसविलेल्या दर्जेदार फरशीची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी शाळेच्या वतीने साहेबांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रकारात अग्रेसर असलेल्या साकोरेमळा शाळेच्या वाढलेल्या पटाची तसेच बदललेल्या शाळेच्या भौतिक कायापालटासाठी शिक्षक व ग्रामस्थांचे साहेबांनी भरभरुन कौतुक केले.व यापुढील काळातही शाळेसाठी आईच्या नावाने फाऊंडेशन स्थापन करुन त्याद्वारे शाळेला भरीव सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी सोबत उपसरपंच संतोष वाव्हळ , ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला वाव्हळ, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संगिता वाव्हळ , सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मेहेर , यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी गाढवे सर व उपशिक्षक नितीन शेजवळ सर हे उपस्थित होते व उपशिक्षक नितीन शेजवळ सर हे उपस्थित होते.