Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

मंचर : खुनातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मंचर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

  मंचर ता २१ : मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी मंचर येथील गौरव शिवाजी राजगुरू या २९ वर्षीय युवकाला दोघांनी लथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण करत गौरवचा खून केला होता. यासंदर्भात गौरवचे वडील शिवाजी राजगुरू यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.  दरम्यान गौरव राजगुरुला मारहाण झालेल्या परिसराची पोलिसांनी बारकाईने तपासणी केली, मंचर एस टी स्टँड परिसरातील लक्ष्मी रोडवर असणाऱ्या एम जी मार्केट च्या जवळील न्यू हाय फॅशनच्या गल्लीत दोन इसम गौरवला मारहाण करत असल्याचे तेथील सी. सी. टीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. त्या फुटेजच्या आधाराने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून मंचर येथील आरिफ अजीज कुरेशी आणि जुन्नर येथील संत्या उर्फ संतोष नारायण सकत (मूळ गाव, सांगवी, त्रिरत्ननगर, ता. जि. नांदेड) या दोघांना अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास जिल्हाअधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलुस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस हवालदार नंदकुमा...

शिवशंकर सहकारी दूध उत्पादक संस्था करते शेतकरी गवळी बांधवांची दिवाळी गोड

प्रतिनिधी: प्रमिला टेमगिरे, थोरांदळे  शिवशंकर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित थोरांदळे यांच्या कडून दूध उत्पादक शेतकरी गवळी बांधवांना दिवाळी निमित्त बोनस व फराळ वाटप .  शिवशंकर दूध उत्पादक संस्था ही गेली १२ वर्षापासून गवळी बांधवांना दिवाळी निमित्त बोनस व फराळ वाटपाचा उपक्रम राबवत आहे .शिवशंकर दूध उत्पादक संस्थेत दूध घालणारा गवळी त्याचे एक लिटर दूध असो वां उच्चांकी दूध असो .या संस्थेने सगळ्यांना समान पद्धतीने दिवाळी फराळ वाटप करून गवळी बांधवांना त्यांच्या दुधाच्या अनुक्रमे बोनस वितरण करून सभासद व गवळी बांधवांची दिवाळी आनंदाची केली .त्यासोबत शिवशकर दूध उत्पादक संस्थेने ज्या गवळी लोकांचे सर्वात जास्त दूध संकलन आहे त्यांना ब्ल्यांकेट पण वितरीत केले असून सरासरी सर्व शेअर्स सभासदांना उत्तम कॉलटीचे फायबर टब दिवाळी भेट म्हणून देऊन सन्मानित केले . या कार्यक्रमाचे आयोजन करताना त्यांनी नियोजित केल्याप्रमाणे ही दिवाळी भेट त्यांनी महिला गवळी म्हणून त्यांना कार्यक्रमात बोलावून त्यांना बोनस व दिवाळी भेट प्रत्येकी महिलेला भाऊबीज भेट म्हणून ब्लाउस पिस पण भेट देण्यात आले .शिवशंकर सहकारी द...

मेघालय लर्निंग टूर साठी आलेल्या सदस्यांचा पंचायत महिला लोकप्रतिनिधींसोबत संवाद

प्रतिनिधी: प्रमिला टेमगिरे, थोरांदळे दि 19 ऑक्टोबर 2022 रोजी मेघालय सरकार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन युनिटच्या अधिकारी व सदस्यांचा अभ्यास दौरा दिनांक 19 व 20  ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. पहिल्या दिवशी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी मंचर येथील हॉटेल स्वराज येथे या टीमची पुणे जिल्ह्यातील निवडक महिला सरपंच, सदस्य, महिला पोलीस पाटील व महिला ग्रामसेवक यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीमध्ये महिलांचा गाव पातळीवरील कारभारातील सहभाग, त्यांना येणाऱ्या समस्या, त्यांनी त्यावर कशी मात केली तसेच राजकारणात उतरल्यानंतर त्यांच्यामध्ये व समाजामध्ये झालेला बदल, त्यांचा लोकं केंद्री व महिला केंद्री गाव विकासातील सहभाग या विषयावर चर्चा झाली. मेघालय जिल्हा प्रकल्प अधिकारी शुहूनजी व  डनांगजी यांनी ही मेघालय राज्यातील महिलांची स्थिती, त्यांचा गाव विकासातील  सहभाग यावर माहिती  दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला राजसत्ता असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक सुनंदा मांदळे यांनी केले. यावेळी आर. एस सी .डी .चे कार्यक्र...

कारफाटा ता. आंबेगाव येथे आढळला महिलेचा मृतदेह. घातपात की अपघात?

 रांजणी. रांजणी, ता. आंबेगाव येथे अष्टविनायक महामार्गालगत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या बाजूलाच काही अंतरावर एक दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली आहे. या ठिकाणापासून जवळपास ५० ते ६० फूट अंतरावर अपघाताच्या खुणा (कृत्रिम?) दिसत आहेत.  हा अपघात? रात्रीच्या सुमारास घडल्याचे बोलले जात असून, गुरुवार दि. २० ऑक्टोबर रोजी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंना हा मृतदेह आढळून आला. 

खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.. खालुंब्रे येथील शुभम शिंदे यांना राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार झाला जाहीर

खेड प्रतिनिधी: राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार खालुंब्रे येथील शुभम शिंदे यांना जाहीर झाला असून , संगीत व कला विभाग आर्ट बिट्स फाऊंडेशनकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.एक प्रतिभावान कलाकार व युवा पखवाज वादक म्हणून केलेल्या उलेखनिय कार्याची दखल घेऊन यंदाचा हा पुरस्कार खेड तालुक्यातील खालुंब्रे गावचे शुभम शिंदे यांना जाहीर झाला आहे.याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.  या पुरस्काराची माहिती देताना आर्ट बिट्स पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की ,आर्ट बिट्स ही संस्था गेली एकवीस वर्ष सातत्याने नामांकित कलाकारांना हे पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक पातळीवर कामाची पाहणी करूंन जाहीर करण्यात येतात.यावर्षी संगीत कला या विभागात हा पुरस्कार खालुंब्रे गावचे शुभम शिंदे यांना जाहीर झाला आहे शुभम शिंदे हे एक प्रतिभावंत युवा कलाकार आहेत. समाधान महाराज सुरवडकर, अशोक महाराजजी पांचाळ यांचे ते शिष्य आहेत तर काही वर्ष ते जगविख्यात पखवाज वादक सुखद मुंढे ,अनुजा ताई बोर्डे यांच्या कडे त्यांनी  शिक्षण घेतले आहे.शुभम शिंदे यांनी  सुप्रसिध्द अशा अनेक शास्त्रीय...

सामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी लोकनेता शिवारात अन अभिनेता थेटरात !!

मंचर प्रतिनिधी: शिवसेना उपनेते , माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी काल जांबुत ता.शिरूर येथील जोरी मळ्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या १९ वर्षीय पूजा नरवडे हिच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून अशा दुर्घटना रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. यासह जुन्नर येथे होणारी बिबट सफारी लवकर पूर्ण झाल्यास मानवी वस्तीवर बिबट्यांचा वावर कमी होऊन अशा घटना भविष्यात घडणार नसल्याचे त्यांनी व माजी आमदार शरद सोनवणे यांनी वनमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपण वेगाने प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत वनविभागाच्या मुख्य सचिवांना निर्देश देत असल्याचे सांगितले. तसेच कै.पूजा नरवडे हिच्या वडिलांशी फोनवरून बोलून नरवडे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. वनविभागाचे उपवनसंरक्षक सातपुते , शिरूरचे वनपरिक्षेत्रअधिकारी म्हसेकर यांच्यासोबत यावेळी बैठक घेऊन व परिसराची पाहणी करून परिसरात तात्काळ पिंजरे लावण्यात येऊन बिबट्य...

कळंब चास रस्ता खड्यात.

प्रतिनिधी:समीर गोरडे आंबेगाव तालुक्यातील कळंब, चास, कोकणे चिंचोली रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दिवसभरात या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत आहे तसेच हा रस्ता घोडेगाव भिमाशंकरसाठी सोयीचे असल्याने वाहनांची वाहतूकही मोठी प्रमाणात होते. साकोरे नजीक या रस्त्याची चाळण मोठ्या प्रमाणात झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी पडतो, परंतु ठेकेदारांकडून रस्त्याचा कामाचा दर्जा राखला जात नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्याची दयनीय अवस्था होती कळंब चास चिंचोली को हा रस्ता साधारण २० किमी अंतर आहे अनेक ठिकाणी हा रस्ता खड्यात गेल्याने या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात होत आहे तसेच ठेकेदारांनी रस्त्याचे काम करताना पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेने जाण्याची व्यवस्था न केल्याने सर्व पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरुन प्रवास करणे धोकादायक झाले आहे संबधित विभागाने कळंब चास रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी व वाहन चालकांकडून होत आहे.

कपाशी आणि तुरीच्या पिकांमध्ये गांज्याची लागवड;पोलिसांनी केली कारवाई.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकाची लागवड केली आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यातील एकाने दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये चक्क गांजाची लागवड केल्याची घटना समोर आली आहे. सोयगावच्या जरंडी शिवारात सोयगाव पोलिसांच्या कारवाईत हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी तब्बल तीन तास कारवाई करून ६३ किलो ९५० ग्रॅम गांजाची झाडे हस्तगत करून ३ लाख वीस हजार ९५० रुपये मुद्देमाल शेतातून हस्तगत केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सोयगाव-बनोटी रस्त्यालगत जरंडी शिवारात एकाने कपाशी व तूर लागवड केलेल्या दोन एकर क्षेत्रात गांजाची लागवड केली असल्याची माहिती सोयगाव पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जरंडी शिवारातील गट क्र. २९ मधून ६३ किलो ९५० ग्राम वजनाची गांजाची झाडे हस्तगत केली. ही कारवाई सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनमोल केदार , उपनिरीक्षक सतीश पंडित , जमादार राजू मोसम बर्डे , गणेश रोकडे , ज्ञानेश्वर सरताळे , रवींद्र तायडे , अजय कोळी यांनी केली आहे. ...

काटाळवेढा येथे विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ.

पारनेर प्रतिनिधी: लोकनेते आमदार निलेश लंके व जिल्हा परिषद सदस्या राणी निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नांतून २०२१-२०२२ जनसुविधेअंतर्गत मंजुर विकासकामांचा शुभारंभ आज जिल्हा परिषद सदस्या राणी निलेश लंके यांच्या शुभहस्ते पार पडला एकूण ३३ लक्ष रुपये इतका निधी मंजूर असून त्याअंतर्गत खटाटेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण १० लक्ष रुपये , गावठाण ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्ता काँक्रीटीकरण १० लक्ष रुपये , स्मशानभूमी परिसर विकास करणे १० लक्ष रुपये , त्याचबरोबर काटाळवेढा व डोंगरवाडी स्मशानभूमी लाईट व्यवस्था करणे ३ लक्ष रुपये ही विकासकामे समाविष्ट आहेत , बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेला खटाटेवस्ती रस्ता मार्गी लागल्यामुळे वस्तीवरील नागरिकांनी आमदार निलेश लंके जिल्हा परिषद सदस्या राणी निलेश लंके यांचे आभार मानले. येणाऱ्या काळात काटाळवेढा व डोंगरवाडी गावासाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या राणी निलेश लंके यांनी दिली . उदघाटनप्रसंगी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती त्यात सरपंच पियुष गाजरे , उपसरपंच गणेश पवार, माजी उपसरपंच अजित भाईक , तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गुंड ...

वासुंदे - खडकवाडी रस्त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी;आमदार निलेश लंके हस्ते १५ ऑक्टोबरला शुभारंभ.

पारनेर प्रतिनिधी: पारनेर - संगमनेर तालुक्याला जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या वासुंदे ते खडकवाडी या ७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ वासुंदे येथे होणार असल्याची माहिती गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे व माजी सरपंच महादू भालेकर व रविंद्र झावरे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाल्याने खडकवाडी, मांडवे, पळशी, वासुंदे, माळवाडी, देसवडे, बोकनकवाडी, लाखेवाडी, शिक्री, कामटवाडी, टेकडवाडी   व परिसरातील वाडी वस्तीवरील लोकांनी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वेळोवेळी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी भरीव असा ७ कोटी रुपये निधी रस्ता दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी प्रथमच एवढे मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. खडकवाडी वासुंदे परिसरातील १० ते १५ गावांसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल...

बिबट्याच्या हल्ल्यात १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू .

प्रतिनिधी:विलास भोर  जांबुत ता. शिरूर येथील जोरी मळ्यातील १९ वर्षीय पुजा भगवान नरवडे या युवतीवर ती घराबाहेर लघुशंकेसाठी गेली असता, ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिला हल्ला करून ठार केले आहे.       ही युवती कला शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. जांबुत गावात यापुर्वी बिबट्याने एका बालकाचा व दोन महीन्यापुर्वी एका युवकावर हल्ला करुन ठार केले होते. पुन्हा याच गावात १९ वर्षीय युवतीवर हल्ला करून ठार केलेली ही तिसरी घटना असून जांबुत परीसरासह बेट या भागातील नागरीक प्रंचड भयभीत झाले असून वन विभागाच्या कारभारावर संतप्त झाले आहे. तसेच आमदाबाद येथे सोनवणे यांच्या शेळीवर हल्ला करून ठार केले आहे. बिबट्याने बेट भागात उच्छाद मांडला असून बिबट्याच्या हल्ल्यात या तीन जणांचा नाहक बळी गेला असून वडनेर , पिंपरखेड येथील नागरीक गंभीर जखमी केले आहे. शिरूर तालुक्यात बिबटयांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्यामुळे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना बिबटयाचे दर्शन होत आहे. पशूधनाबरोबरच नागरीकांवर हल्ले होत असल्याने   तीव्र प्रतिसाद उमटले आहे. या भागात बिबट्या नरभक्षक बनला असून अजून किती ...

पारगाव तर्फे अवसरी बु. ठिकाणी महाराजस्व अभिनायांतर्गत फेरफार अदालत कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी:समीर गोरडे मंडळ अधिकारी कार्यालय पारगाव तर्फे अवसरी बु . याठिकाणी महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत फेरफार अदालत कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी आंबेगाव तालुका तहसील रमा जोशी ह्या देखील उपस्थित राहून फेरफार अदालत कार्यक्रमात फेरफार दुरूस्ती करून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावताना दिसत होत्या . ह्यावेळी शेतकऱ्यांना पिक पाहणीसाठी त्यांनी आव्हान देखील केले .   मंडळ अधिकारी विश्वास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण करून प्रश्न मार्गी लावले तसेच मंडळ अधिकारी कार्यालय अंतर्गत येणारे पारगाव तलाठी व्ही व्ही खोटे , निरगुडसर तलाठी व्ही एम मुगदळे तसेच शेतकरीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शिंगवे नागापूर बंधाऱ्यावरील ढाप्यांची चोरी.

प्रतिनिधी :पारगाव शिंगवे नागापूर गावच्या हद्दीत असलेल्या थापलींग येथील पायथ्यालगत असलेल्या बंधाऱ्यायावरील ४१ ढाप्यांची चोरी झाली आहे. याबाबत पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस स.निरीक्षक लहू थाटे , पोलीस उपनिरीक्षक लोहकरे , भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ , नागपूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. नितीन वाव्हळ हे शेतकरी शेतीकडे पाणी सोडण्यासाठी जात असताना सकाळी बंधाऱ्यावरील ४१ ढापे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.याबाबत त्यांनी सरपंच शिंदे यांना माहिती दिली. या अगोदरही बंधाऱ्यावरील १० ढापे चोरीला गेले होते.

आंबेगाव तालुक्यातील चास येथे प्राथमिक, माध्यमिक, आणि महाविद्यालयांना डस्टबिन वाटप.

मंचर प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक ,  माध्यमिक व महाविद्यालयांना पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य तुलसी सचिन भोर यांच्या पुढाकारातून बारा लाख रुपये किमतीचे २७३ डस्टबिन देण्यात आले. त्यामुळे शाळांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे ,  असे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील यांनी सांगितले.      चास , ता.आंबेगाव येथे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हिंगे पाटील बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम ,  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील ,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन भोर ,  पोलीस निरीक्षक जीवन माने ,  शरद बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे ,  किसनराव सैद ,  भीमाशंकरचे संचालक अंकित जाधव ,  दादाभाऊ पोखरकर ,  बाबासाहेब खालकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. तुलसी भोर म्हणाल्या  “ गावात व शाळेत कचरा होऊ नये म्हणून जागरूक नागरिक शाळांमधून घडावेत ,...

शब्द पाळणारा नेता.

मंचर प्रतिनिधी: दि. २७ सप्टेंबरला गिरवली येथे अपघात झालेल्या पिंपळगाव घोडा गावचे शाळकरी मुलांची व पालकांची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे भेट घेतली होती तसेच आस्थेने विचारपूस करून चौकशी केली होती . हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी सरकार घेईल असे सर्व नातेवाईकांना दादांना अश्वस्थ केले होते. त्याप्रमाणे आज त्यामधील चार रुग्णांना  ज्योती लडके, नम्रता लडके, गीतांजली शर्मा व लिलाधर लांडगे याना रुग्णालयातून उपचार करुन सोडण्यात आले. त्यांचे सर्व हॉस्पिटल बिल सांगितल्या प्रमाणे चंद्रकांत पाटिल यांच्या माध्यमातून भरण्यात आले. हॉस्पिटल बिलाची पुर्तता करण्यासाठी चंद्रकांत पाटिल यांच्याकडुन नामदेव ढाके आले होते. त्यावेळी महेश दादा फाउन्डेशनचे अध्यक्ष कुंदन काळे उपस्थित होते. सर्व नातेवाईकांनी तसेच संस्थेच्या पदाधिकारी शिक्षक कर्मचारी वृंद यानी चंद्रकांत पाटिल यांचे आभार व्यक्त केले . या सर्वांचा पाठपुरावा बाळा भेगडे , जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे , तालुकाध्यक्ष डॉ . ताराचंद कराळे यांनी केला.त्यांचे ही नातेवाईक व आंबेगाव तालुका विद्या विकास ...

अवसरीमध्ये आम आदमी पार्टीचा मेळावा संपन्न

मंचर प्रतिनिधी: अवसरी ता. आंबेगाव येथे आम आदमी पार्टीचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांच्या हस्ते आंबेगाव तालुका आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यांनी संघटक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अरविंद केजरीवालांच्या मेक इंडिया नं. 1 कॅपेनची माहिती दिली व भडकलेल्या महागाईत दुध दही यावरसुद्धा टैक्स भरणारया जनतेला शिक्षण आरोग्य, वीज ,पाणी, रस्ते या मुलभुत सुविधा मोफत का मिळाव्यात याविषयी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील सर्व निवडणूका लढवणार असल्याचे जाहिर केले. याप्रसंगी जिल्हा सचिव,अक्षय शिंदे, तालुका समन्वयक वैभव टेमकर, जुन्नर तालुका समन्वयक संजय चव्हाण समन्वयक, अनिल भोर, गणेश टाव्हरे, सयाजी शेवाळे, मंचर शहर अध्यक्ष सालिम इनामदार, नामदेव खिलारी, सुनिल खिलारी, राजेश जाधव, रहेमान इनामदार, अंकुश राठोड, अतुल शेंडे या आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत खेड चाकण येथील संघटकदेखील उपस्थीत होते.  याप्रसंगी वैभव टेमकर आंबेगाव तालुका यांनी...

दुचाकीच्या अपघातात ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.

मंचर प्रतिनिधी:   पेठ गावच्या हद्दीत अन्नपूर्णा हॉटेल जवळ पुणे नाशिक हायवे रोडवर विलास पांडुरंग चासकर (वय.३७ वर्ष) रा.पेठ , ता.आंबेगाव , जि.पुणे या व्यक्तीचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.याप्रकरणी विनायक पांडुरंग चासकर (वय.३३ वर्ष) मयत इसमाच्या   भावाने   मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की , २१ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पेठ येथे अन्नपूर्णा हॉटेलजवळ नाशिक पुणे हायवे रोडवर अपघातामध्ये फिर्यादी यांचा मोठा भाऊ विलास पांडुरंग चासकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सदर   व्यक्ती हे त्याची स्वतःची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल एम.एच.१४ बी.जे.५०३१ वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव गाडी चालवत होते. याकारणाने मोटार सायकल स्लिप झाली.गाडी स्लिप झाल्याने विलास चासकर खाली पडले त्यामुळे डोक्यास आणि तोंडास किरकोळ व गंभीर दुखापत झाली.ह्या झालेल्या अपघातामध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मोटार सायकलचेही किरकोळ नुकसान झाले आहे.सदर नुकसानीस आणि मृत्यूस स्वतः जबाबदार आहे.अशी फिर्याद फिर्यादी मयत व्यक्तीचे भाऊ विनायक चासक...

लांडेवाडी येथे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील प्रेक्षागृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला.

मंचर प्रतिनिधी: लांडेवाडी येथे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील प्रेक्षागृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला.हा सोहळा सिनेअभिनेते प्रशांत दामले, प्रवीण तरडे, रवी काळे यांसह जुन्नरचे माजी आमदार जिल्हाप्रमुख शरद सोनवणे फॉक्स वॅगनचे जनरल मॅनेजर जयेश सुळे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, शिरूर हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी आंबेगाव जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर,डायनालॉग इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील, खेड भाजप नेते अतुल देशमुख, कल्पना आढळराव पाटील, अपूर्व आढळराव पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, भाजप जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, संपर्क नेते जयसिंग एरंडे आदी मान्यवरांच्या हस्ते झाला. लांडेवाडी येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेले प्रेक्षागृह हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितच महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल असे मत यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान यावेळी एका लग्नाची पुढची गोष्ट या अभिनेते प्रशांत द...

कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात

पुणे प्रतिनिधी: एमआयटी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री ही अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 5 जण जखमी झालेत. सासवड पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या या अपघाताची नोंद करण्यात आलीय. गौरव ललवाणी, वय 19 आणि रचित मोहता, वय 18 अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर पाच विद्यार्थ्यांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाच विद्यार्थ्यांमध्ये 3 मुलींचाही समावेश आहे. एका तीव्र वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर रस्त्याच्या शेजारीच असलेल्या दुकानांना ही कार धडकली आणि उलटली. भरधाव वेगामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं असण्याची शक्यता वर्तवली जातेय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारही जागच्या जागीच उलटली होती. एमआयटी कॉलेजात शिकणारे हे सर्व विद्यार्थी असून ते देवदर्शनासाठी निघाले होते. नारायणपूरला देवदर्शनासाठी जाण्याचं बेत त्यांनी आखला होता. ठरल्याप्रमाणे ते देवदर्शनासाठी निघाले. पण वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला. ...

जि. प.प्राथ. शाळेला ACP पंढरीनाथ वाव्हळ यांनी दिली भेट.

प्रतिनिधी:समीर गोरडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमळा शिंगवे येथे सेवानिवृत्त ACP पंढरीनाथ वाव्हळ  यांनी भेट देऊन शाळेच्या झालेल्या कामाची पाहणी केली. साहेबांना तीन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना वर्गातील फरशी अभावी बसण्यासाठी होत असलेली गैरसोय लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी दिलेल्या सुमारे ७०००० रु .निधीतून शाळेच्या वर्गखोल्यांची व शालेय  वर्हांडा यासाठी बसविलेल्या दर्जेदार फरशीची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.  यावेळी शाळेच्या वतीने साहेबांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रकारात अग्रेसर असलेल्या साकोरेमळा शाळेच्या वाढलेल्या पटाची तसेच बदललेल्या शाळेच्या भौतिक कायापालटासाठी शिक्षक व ग्रामस्थांचे साहेबांनी भरभरुन कौतुक केले.व यापुढील काळातही शाळेसाठी आईच्या नावाने फाऊंडेशन स्थापन करुन त्याद्वारे शाळेला भरीव सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी सोबत उपसरपंच  संतोष वाव्हळ , ग्रामपंचायत सदस्या  उज्ज्वला वाव्हळ,  शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष  संगिता वाव्हळ , सामाजिक कार्यकर्ते...

अक्षय बोऱ्हाडे आत्महत्येच्या प्रयत्नासंदर्भातील वृत्ततील मुद्रणदोष खुलासा

  अक्षय बोऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा प्रयत्न या प्रकरणात नगरसेवक दीपेश परदेशी यांचे नाव नजरचुकीने तक्रारदार म्हणून घेण्यात आले असून अक्षय मोहन बोऱ्हाडे यांच्या बाबतीत झालेल्या तक्रारीशी माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी यांचा कुठलाही संबंध नाही, प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाकडून झालेल्या मुद्रणदोषासाठी आम्ही दिलगीर आहोत. समर्थ भारत न्यूज पोर्टल आणि वृत्त वहिनी विभाग.

सामाजिक कार्यकर्ते अक्षय मोहन बोऱ्हाडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न!

 प्रतिनिधी:विलास भोर  एका गुन्ह्याच्या तपासासाठी जुन्नर पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील अक्षय मोहन बोऱ्हाडे यांना ताब्यात घेतले असताना , बोऱ्हाडे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. जुन्नरचे परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुन्नर पोलिसांनी अक्षय बोऱ्हाडेंवर गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्ह्यात अक्षय बोऱ्हाडे फरार होते , नुकतंच पोलिसांनी अक्षय बोऱ्हाडेंना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या ताब्यात असतानाच अक्षय बोऱ्हाडे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेनंतर अक्षय बोऱ्हाडे यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना केल्या आहेत.