मंचर प्रतिनिधी:
पक्ष चिन्हाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव
ठाकरेंनी पहिल्यांदा भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेची माजी खासदार आढळराव
पाटलांवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत असल्याचे म्हणत ठाकरेंनी आढळराव
पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे
राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवनेरीचा अपमान असल्याचेही उद्धव यांनी म्हटले आहे.
ते मातोश्री निवस्थानाबाहेर पुणे आणि यवतममाळच्या कार्यकर्त्यांशी
संवाद साधताना बोलत होते. ठाकरेंच्या या टीकेनंतर आता आढळराव पाटील नेमकं काय
उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दसऱ्याला काहीच दिवस शिल्लक असून, येताना शिस्तीने या असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. विरोधक शिवसैनिकांकडून काहीतरी चुकीचं करून घेण्याचे प्रयत्न करतील पण तुम्ही सावध राहा असा सल्लादेखील ठाकरेंनी यावेळी दिला. आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना जनतेच्या मनाला महत्व देते ती लढाई आपण केव्हाच जिंकली असल्याचे सांगत ती लोकांच्या मनात तशीच राहू द्या असे ते म्हणाले.