जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त संजय थोरात व पदाधिकाऱ्यांनी स्वरनाद कर्णबधीर मुलांच्या वाचा भाषा प्रशिक्षण केंद्राला दिली भेट.
मंचर प्रतिनिधी:
काँक्लिआ पुणे फॉर हेअरिंग अँड स्पीच कर्णबधिरत्व जनजागृती फेरी/रॅली चे आयोजन मंचर शहरांमध्ये करण्यात आले.स्वरनाद कर्णबधिर मुलांचे वाचा भाषा प्रशिक्षण केंद्राला आज जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा पुणे संजय थोरात यांनी भेट दिली व उपस्थित मुलांना व पालकांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आला व येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे काही समस्या असतील ते सोडवल्या जातील अशी ग्वाही देण्यात आली.कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात, डॉक्टर तोडकर सर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, पंचायत समिती सभापती उषा कानडे, ग्रामपंचायत मा सदस्य ज्योती निघोट, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस स्नेहल चासकर, जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा नवनाथ थोरात, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सुरेश अभंग, शिक्षिका अयोध्या शिंदे, स्वाती मोरडे, पल्लवी निघोट, मंगल पाटील, कांचन बागल तसेच पालक उपस्थित होते.