मंचर प्रतिनिधी:
टाव्हरेवाडी गावांमध्ये महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) मुक्तीसाठी साळी मेडिकल फाउंडेशन व ग्रामपंचायत टाव्हरेवाडी व महिला बचत गट यांच्या सहकार्याने उचललं नवीन पाऊल गावातील १०५ महिलांची रक्त तपासणी तसेच व इतर तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीच्या निष्कर्ष प्रमाणे रक्तक्षय असणाऱ्या स्त्रियांना पुढील उपचार औषधे साळी मेडिकल फाउंडेशन व एम क्यू आर फार्मसीटीकल कंपनी यांच्यातर्फे मोफत करण्यात येणार आहे. तसेच शारीरिक योग्य आहार व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन व परसबाग इत्यादी संबंधित वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार असून, टाव्हरेवाडीतील सर्व महिलांची रक्तक्षयापासून मुक्ती करण्यासाठी पुढील सहा महिने ते वर्षभर मोहीम राबवली जाणार आहे. डॉक्टर मोहन साळी यांनी सांगितल्याप्रमाणे या शिबिरासाठी गेटवेल हॉस्पिटल व हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी टाव्हरेवाडीतील ४६ महिला बचत गट चैतन्य संस्था यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मा.संचालक बाळासाहेब टाव्हरे, लोकनियुक्त सरपंच तथा परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष उत्तमराव टाव्हरे , उद्योजक बबनराव टाव्हरे . उपसरपंच भरत टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य महेश टाव्हरे, सानिका टाव्हरे, ज्ञानेश्वर शिंदे, ग्रामसेवक तथा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत बारवे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र हिंगे, मोहिनी बांगर, आरोग्य कर्मचारी सुजाता पडवळ, अश्विनी एलभर, मिरा बांगर, शैला जांभळे, सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांचे सहकार्य लाभले.