मंचर प्रतिनिधी:
जी.एम.संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या एकूण १३ हजार रुपये
किंमतीचा माल आणि ८० हजार रुपये किंमतीची टाटा कंपनीची नँनो मॉडेलची कार असा एकूण ९३ हजार ४४० रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर याप्रकरणी आरोपी १) विजय विष्णू हिंगे (वय.३४
वर्ष), २)विष्णू गोविंद हिंगे रा.भैरवनाथ आळी अवसरी बुद्रुक, ता.आंबेगाव, जि.पुणे
या दोघांना अटक करण्यात आली आहे.सदर फिर्याद पोलीस नाईक मंगेश बबन लोखंडे (वय.३०
वर्ष) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी
११.१५ वाजण्याच्या सुमारास अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत असणाऱ्या पहाडदरा फाटा,
ता.आंबेगाव येथील रोडवर आरोपी विष्णू हिंगे हा बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या
युवकाला मंचर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.हा युवक आणि त्याचे वडील विष्णू गोविंद हिंगे
चार चाकी वाहनाने अवैधरीत्या देशी दारूची विक्री करत होते.त्यांच्याकडून १३ हजार
४४० रुपये किंमतीचा माल आणि ८० हजार किंमतीची नँनो कार जप्त
करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अवसरी बुद्रुक पहाडदरा फाटा याठिकाणी अवैधरीत्या विनापरवाना देशी दारू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक खैरे करत आहेत.