राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने इंदिरानगर याठिकाणी नागरिकांच्या विविध समस्यांविषयी शासकीय योजना कॅम्पचे आयोजन.
मंचर प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा,ओबीसी मोर्चा आंबेगाव तालुका यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा राबवला जात आहे. यानिमित्ताने आज इंदिरानगर या ठिकाणी आयुष्यमान कार्ड, ई- श्रम कार्ड,बांधकाम नोंदणी, मतदार दुरुस्ती,रेशन कार्डवरील समस्या अशा अनेक विषया संदर्भात कॅम्पचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात,जेष्ठ नेते भानुदास नाना काळे, जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश अभंग, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस स्नेहल चासकर, उत्तम राक्षे सर, युवा नेते गणेश थोरात, कालिदास गांजाळे, गजानन राजगुरू, शिवाजी राजगुरू, पंकज भालेराव, गोरक्ष भालेराव, बाळू मोरे, नंदू पवार, अंबिका माता प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी नागरिकांना काही समस्या असल्यास भाजप कार्यालय मंचर या ठिकाणी येऊन सांगाव्यात असे आव्हान केले.तसेच नवनाथ थोरात यांनी सेवा पंधरवडा निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा सुरेश अभंग यांनी आलेल्या सर्वांची आभार मानले.