शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मंचर ही आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसांची संस्था - ॲड.अविनाश रहाणे.
मंचर प्रतिनिधी:
मंचर येथील
शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने आठ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला
आहे.रौप्यमहोत्सवी वर्षात पतसंस्था विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष
शांताराम जाधव यांनी दिली.
मंचर येथील
शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शांताराम
बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी विद्यालया शेजारील मंगलमुर्ती
लॉन्स कार्यालयात पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
पतसंस्थेचे संस्थापक ॲड.अविनाश रहाणे, संचालक सुनील बाणखेले, सुरेश चव्हाण, संदीप गुंजाळ, संतोष डोके, रवींद्र सोनवणे, माधवी अविनाश रहाणे, विजया सुहास चव्हाण, दिनकर रोकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, सल्लागार अरुण नाना बाणखेले, गणपतराव कराळे, दत्तात्रय खानदेशे, लोकनेते माजी
खासदार किसनराव बाणखेले, वि.वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन अरूण लोंढे, संचालक दत्तात्रय माशेरे, उत्तम शेठ भेके, दिनेश बाणखेले, कायदेविषयक सल्लागार विलास शेटे, पत्रकार सदानंद शेवाळे, धर्मवीर संभाजी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव पिंगळे, भिमाशंकर नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण चिखले, तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन
राजु सोमवंशी, विद्यमान व्हा.चेअरमन विजय जाधव आदी उपस्थित होते.
संस्थापक ॲड.अविनाश रहाणे म्हणाले पंचवीस वर्षांपूर्वी सामान्य कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन शिवकल्याण पतसंस्थेची स्थापना केली.आता पतसंस्थेची प्रगती वेगाने सुरू आहे.चालू आर्थिक वर्षात सभासदांना १२ टक्के प्रमाणे लाभांश दिला जाणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी अहवाल वाचन केले.यावेळी सल्लागार गणपतराव कराळे, माजी प्राचार्य भीमराव बाणखेले, सोपानराव बाणखेले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत संतोष बाणखेले, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष सिताराम लोंढे, बाळासाहेब खानदेशे, वि.श.महामुनी, भास्कर सावंत, जागृती महाजन, विठ्ठल भाऊसाहेब पाचपुते यांनी सहभाग घेतला. आदर्श ऊस उत्पादक शेतकरी दत्तात्रेय खानदेशे तसेच आदर्श ठेवीदार व आदर्श कर्जदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सहकार अधिकारी मा.हिरामण ढोरे यांनी सहकार कायद्याविषयी माहिती व प्रशिक्षण दिले. संचालक संतोष डोके यांनी सूत्रसंचालन तर सुनील बाणखेले यांनी आभार मानले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला.सिने कलाकार बाळकृष्ण नेहरकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात महिला सभासदांनी उस्फुर्त सहभाग घेतला. संचालिका विजया सुहास चव्हाण या मानाच्या प्रथम पैठणीच्या मानकरी ठरल्या. तसेच तेजस्विनी अजित सोनवणे(पैठणी), मोनिका सुनील बाणखेले(पैठणी), प्राजक्ता योगेश थोरात(सोन्याची नथ), रीना संतोष डोके(टेबलफॅन) अनिता विकास जाधव(साडी), स्वाती किसन बाणखेले(साडी) बक्षीस देण्यात आले.तर सर्व सहभागी सभासदांच्या अर्धांगीनीना संस्थेच्या वतीने भेटवस्तु देण्यात आली.