दिलीप वळसे पाटलांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची केली विचारपूस.
मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव
तालुक्यातील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई
प्रशाला हायस्कूलच्या बसला गिरवली येथे घाटात अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या
विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव, साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे ठेवण्यात आले आहे.
त्यावेळी आज दिलीप वळसे पाटलांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. यावेळी पालकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. संबंधित डॉक्टरांशी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळावेत व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना केल्या. अपघात झाल्याप्रकरणी शाळेच्या बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवण्याचा आरोप होत आहे. प्रशासन याबाबत पुढील कार्यवाही करेल, अशी मला खात्री आहे अशी आशा यावेळी वळसे पाटलांनी व्यक्त केली.