घोडेगाव प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथीलशाळेतील विद्यार्थ्यांची गिरवली येथील आयुका केंद्रावर अभ्यास दौर्यासाठी गेले असता. बस क्र. MH 14 CW 3553 दरीत कोसळली असून अनेक विद्यार्थी आणि शिक्षक हे देखील जखमी आहेत.
जखमींना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन जखमींचा आकडा अद्याप समजलेला नाही.
अपडेट वा 4.54
अपघातील अनेक जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील सिध्दी हॉस्पिटल आणि मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.
अपडेट वा.5.14
या बसमध्ये आठवी, नववी आणि दहावीचे जवळपास 45 विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांची बस जवळपास तीन वेळा उलटून 150 फूट खोल दरीत जाऊन सागाच्या झाडाला अडकली, दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये 3 विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पुढील माहिती याचं बातमीमध्ये अपडेट केली जाईल.
अपडेटेड माहितीसाठी याच लिंकला बातमी पहा.