मंचर प्रतिनिधी:
डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लाकडी पूल व झेड
ब्रिजच्यामध्ये मुठा नदीच्या बाजूला परिसरात अनोळखी इसमाला जखमी करून खून करण्यात
आला.यावेळी डेक्कन पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत २४ तासाच्या आत आरोपींना बेड्या
ठोकल्या.याप्रकरणी मयत इसमाच्या वडिलांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी डेक्कन
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लाकडी पूल व झेड ब्रिजच्यामध्ये मुठा नदीच्या
बाजूला असलेल्या नदीपात्र जवळील परिसरात अनोळखी इसम बेशुद्ध व जखमी अवस्थेत पडला
असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली.सदर माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मुरलीधर करपे व डेक्कन पोलीस स्टाफ माहिती मिळालेल्या ठिकाणी रवाना झाले.सदर इसमास
कोणीतरी अज्ञात लोकांनी धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारले आहे.मयत झालेल्या
इसमास व मारेकरी यांना प्रत्यक्षात पाहणारे साक्षीदार व सीसीटीव्हीद्वारे
मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.१) नरेश गणेश
दळवी (वय.३० वर्ष), २) अजय शंकर(वय.२५ वर्ष), समीर कैलास कारके (वय.२६ वर्ष) सर्व
रा.उर्से, ता.मावळ, जि.पुणे या आरोपींना त्यांच्या राहत्या असलेल्या परिसरातून ताब्यात
घेतले असून सदर आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.आरोपींना खुनाच्या
गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चोरमले करत आहेत.