मंचर प्रतिनिधी:
मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळी होणाऱ्या भांडणातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी सकाळी १०
ते ११
व दुपारी ४ ते ५:३० च्या वेळेत महिला कॉन्स्टेबलसह पोलीस बंदोबस्त
ठेवण्यात यावा अशी मागणी मंचर शहर शिवसेनेच्या वतीने मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांच्याकडे करण्यात आली आहे.
मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयाच्या परिसरात दोन दिवसांपुर्वी नववी दहावीच्या
विद्यार्थ्यां मध्ये झालेल्या कोयता हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांमध्ये
निर्माण होत असलेली गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांच्यामध्ये कायद्याची दहशत असणे आवश्यक आहे.
गेल्या काही
वर्षांत मंचर परीसरात टोळी युद्धातुन तरूणांचे
खून
झाले. मंचर हे शिक्षणाचे हब बनू पहात आहे.या शहरात महात्मा गांधी विद्यालयासारखे प्रथितयश शैक्षणिक संकुल आहे. शहरातुन व तालुक्यातील जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.शाळेला चांगला
इतिहास
आहे.परंतु ९वी ,१०वीत शिकणारी काही मुले शाळा भरण्यापूर्वी
किंवा शाळा सुटल्यावर भांडणे करतात. दहशत निर्माण करण्यासाठी गावातून गुंड
प्रवृत्तीच्या लोकांना फोन करून बोलावून घेतात.यामुळे मुलिंची कुचंबणा होते.टोळी युद्धाचे स्वरूप प्राप्त होते. साऊथचे चित्रपट व टि.व्ही.सिरीयल पाहुन अल्पवयीन मुलांमध्ये
अशी
गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू
लागली आहे. तिला वेळीच आवर घालण्यासाठी व कायद्याची दहशत रहाण्यासाठी सकाळी शाळा
भरण्याच्या वेळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी महिला कॉन्स्टेबलसह पोलीस
बंदोबस्त ठेवण्यात यावा. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा
विद्यमान जिल्हा स॑घटक ॲड.अविनाश रहाणे व जिल्हा स॑घटक प्रा.राजाराम बाणखेले
यांच्या नेतृत्वाखाली दिल्याची माहिती युवासेनेचे मंचर शहर अधिकारी अमोल बाणखेले यांनी
सांगितले.
यावेळी युवासेनेचे तालुका अधिकारी विवेक पिंगळे, शिवसेनेचे विभाग संघटक विजय जाधव, युवासेना तालुका चिटणीस महेश घोडके, आंबेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष राजू सोमवंशी, शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब थोरात, युवासेना उपशहर अधिकारी अमोल काजळे, जमिल सय्यद, संजय चिंचपुरे, दिपक बाणखेले, चंद्रकांत रोकडे इत्यादी उपस्थित होते.