Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी म.गां.विद्यालयाला पोलीस बंदोबस्त द्या-शिवसेनेची मागणी.

मंचर प्रतिनिधी: मं चर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळी होणाऱ्या भांडणातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी सकाळी १० ते ११ व दुपारी ४ ते ५ : ३० च्या वेळेत महिला कॉन्स्टेबलसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी मं चर शहर शिवसेनेच्या वतीने मंचर पोलीस स्टेशनचे  पोलीस  निरीक्षक सतिश होडगर यांच्याकडे करण्यात आली आहे . मं चर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयाच्या परिसरात दोन दिवसांपुर्वी नववी दहाव ीच्या विद्यार्थ्यां मध्ये झालेल्या कोयता हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांमध्ये निर्माण होत असलेली गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यां च्यामध्ये कायद्याची दहशत असणे आवश्यक आहे . गेल्या काही वर्षांत मं चर परीसरात टोळी युद्धातुन तरूणांचे खून झा ले. मं चर हे शिक्षणाचे हब बनू पहात आहे . या शहरात महात्मा गांधी विद्यालयासारखे प्रथितयश शैक्षणिक संकुल आहे . शहरातुन व तालुक्यातील जवळपास दोन ते तीन ...

टाव्हरेवाडी गावाने महिलांसाठी उचलली नवीन पावलं...

मंचर प्रतिनिधी: टाव्हरेवाडी गावांमध्ये महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) मुक्तीसाठी साळी मेडिकल फाउंडेशन व ग्रामपंचायत टाव्हरेवाडी व महिला बचत गट यांच्या सहकार्याने उचललं नवीन पाऊल गावातील १०५ महिलांची रक्त तपासणी तसेच व इतर तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीच्या निष्कर्ष प्रमाणे रक्तक्षय असणाऱ्या स्त्रियांना पुढील उपचार औषधे साळी मेडिकल फाउंडेशन व एम क्यू आर फार्मसीटीकल कंपनी यांच्यातर्फे मोफत करण्यात येणार आहे. तसेच शारीरिक योग्य आहार व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन व परसबाग इत्यादी संबंधित वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार असून, टाव्हरेवाडीतील सर्व महिलांची रक्तक्षयापासून मुक्ती करण्यासाठी पुढील सहा महिने ते वर्षभर मोहीम राबवली जाणार आहे. डॉक्टर मोहन साळी यांनी सांगितल्याप्रमाणे या शिबिरासाठी गेटवेल हॉस्पिटल व हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी टाव्हरेवाडीतील ४६ महिला बचत गट चैतन्य संस्था यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मा.संचालक बाळासाहेब टाव्हरे, लोकनियुक्त सरपंच तथा परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष उत्तमराव टाव्हरे , उद्योजक बबनराव टाव्हरे . उपसरपंच भरत टाव्हरे , ग्रामपंचा...

बेकायेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या बापलेकाला मुद्देमालासह केली अटक.

मंचर प्रतिनिधी: जी.एम.संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या एकूण १३ हजार रुपये किंमतीचा माल आणि ८० हजार रुपये किंमतीची टाटा कंपनीची नँनो मॉडेलची कार असा एकूण ९३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर याप्रकरणी आरोपी १) विजय विष्णू हिंगे (वय.३४ वर्ष), २)विष्णू गोविंद हिंगे रा.भैरवनाथ आळी अवसरी बुद्रुक, ता.आंबेगाव, जि.पुणे या दोघांना अटक करण्यात आली आहे.सदर फिर्याद पोलीस नाईक मंगेश बबन लोखंडे (वय.३० वर्ष) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी ११.१५ वाजण्याच्या सुमारास अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत असणाऱ्या पहाडदरा फाटा, ता.आंबेगाव येथील रोडवर आरोपी विष्णू हिंगे हा बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या युवकाला मंचर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.हा युवक आणि त्याचे वडील विष्णू गोविंद हिंगे चार चाकी वाहनाने अवैधरीत्या देशी दारूची विक्री करत होते.त्यांच्याकडून १३ हजार ४४० रुपये किंमतीचा माल आणि ८० हजार किंमतीची नँनो कार जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवसरी बुद्रुक पहाडदरा फाटा याठिकाणी अवैधरीत्या विन...

नवरात्रोत्सवात फ्लेक्सवर फोटो न लावल्याने टोळक्याकडून एकाला मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे प्रतिनिधी: नवरात्रोत्सवात फ्लेक्सवर छायाचित्र न लावल्याने चौघांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना पुण्यातील खराडी परिसरात घडली आहे. राजाराम विष्णू पठारे (वय.५२ वर्ष) , बाळासाहेब विष्णू पठारे (वय.५८ वर्ष) , स्वप्नील बाळासाहेब पठारे (वय.२४ वर्ष) आणि सौरव राजाराम पठारे (वय २० वर्ष) सर्व रा. मुंजाबा चौक , खराडी गावठाण यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कैलास दत्तात्रय पठारे (वय ४१ वर्ष) रा. खराडी गावठाण यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कैलास पठारे यांच्या मंडळाकडून खराडी गावठाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात  माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे फ्लेक्सवर छायाचित्र लावण्यात आले होते. आरोपींनी आमचे छायाचित्र का लावले नाही , अशी विचारणा कैलास यांच्याकडे केली. उत्सवातील खर्च मी केला आहे. फलकावर कोणाचे छायाचित्र वापरायचे , हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे , असे कैलास यांनी आरोपींना सांगितले. तेव्हा आरोपी राजाराम , बाळासाहेब , स्वप्नील , सौरव यांनी कैलास यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. गज आणि काठीने कैलास यांना मारहाण केली. सह...

उद्धव ठाकरेंनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली टीका.

मंचर प्रतिनिधी: पक्ष चिन्हाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेची माजी खासदार आढळराव पाटलांवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की , माझ्यासोबत जुनी माणसं आहेत , पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली , पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत असल्याचे म्हणत ठाकरेंनी आढळराव पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत , अन्यथा हा शिवनेरीचा अपमान असल्याचेही उद्धव यांनी म्हटले आहे. ते मातोश्री निवस्थानाबाहेर पुणे आणि यवतममाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. ठाकरेंच्या या टीकेनंतर आता आढळराव पाटील नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दसऱ्याला काहीच दिवस शिल्लक असून , येताना शिस्तीने या असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. विरोधक शिवसैनिकांकडून काहीतरी चुकीचं करून घेण्याचे प्रयत्न करतील पण तुम्ही सावध राहा असा सल्लादेखील ठाकरेंनी यावेळी दिला. आपल्याला लढाई जिंकायची आहे , मग ती कोर्टाती...

जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त संजय थोरात व पदाधिकाऱ्यांनी स्वरनाद कर्णबधीर मुलांच्या वाचा भाषा प्रशिक्षण केंद्राला दिली भेट.

मंचर प्रतिनिधी: काँक्लिआ पुणे फॉर हेअरिंग अँड स्पीच कर्णबधिरत्व जनजागृती फेरी/रॅली चे आयोजन मंचर शहरांमध्ये करण्यात आले.स्वरनाद कर्णबधिर मुलांचे वाचा भाषा प्रशिक्षण केंद्राला आज जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा पुणे संजय थोरात यांनी भेट दिली व उपस्थित मुलांना व पालकांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आला व येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे काही समस्या असतील ते सोडवल्या जातील अशी ग्वाही देण्यात आली.कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात , डॉक्टर तोडकर सर , जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात , पंचायत समिती सभापती उषा कानडे , ग्रामपंचायत मा सदस्य ज्योती निघोट , महिला मोर्चा तालुका सरचिटणीस स्नेहल चासकर , जिल्हा   सरचिटणीस किसान मोर्चा नवनाथ थोरात , ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सुरेश अभंग , शिक्षिका अयोध्या शिंदे , स्वाती मोरडे , पल्लवी निघोट , मंगल पाटील , कांचन बागल तसेच पालक उपस्थित होते.

दिलीप वळसे पाटलांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची केली विचारपूस.

मंचर प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला हायस्कूलच्या बसला गिरवली येथे घाटात अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर , ग्रामीण रुग्णालय घोडेगाव , साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे ठेवण्यात आले आहे. त्यावेळी आज दिलीप वळसे पाटलांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. यावेळी पालकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. संबंधित डॉक्टरांशी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळावेत व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना केल्या. अपघात झाल्याप्रकरणी शाळेच्या बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवण्याचा आरोप होत आहे. प्रशासन याबाबत पुढील कार्यवाही करेल , अशी मला खात्री आहे अशी आशा  यावेळी  वळसे पाटलांनी  व्यक्त केली.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने इंदिरानगर याठिकाणी नागरिकांच्या विविध समस्यांविषयी शासकीय योजना कॅम्पचे आयोजन.

मंचर   प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा , ओबीसी मोर्चा आंबेगाव तालुका यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा राबवला जात आहे. यानिमित्ताने आज इंदिरानगर या ठिकाणी आयुष्यमान कार्ड , ई- श्रम कार्ड , बांधकाम नोंदणी , मतदार दुरुस्ती , रेशन कार्डवरील समस्या अशा अनेक विषया संदर्भात कॅम्पचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात , जेष्ठ नेते भानुदास नाना काळे , जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात , ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश अभंग , महिला मोर्चा तालुका सरचिटणीस स्नेहल चासकर , उत्तम राक्षे सर , युवा नेते गणेश थोरात , कालिदास गांजाळे , गजानन राजगुरू , शिवाजी राजगुरू , पंकज भालेराव , गोरक्ष भालेराव , बाळू मोरे , नंदू पवार , अंबिका माता प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी नागरिकांना काही समस्या असल्यास भाजप कार्यालय मंचर या ठिकाणी येऊन सांगाव्यात असे आव्हान केले.तसेच नवनाथ थोरात यां...

दोन वर्षाच्या चिमुरड्याचा हौदात पडून मृत्यू.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क : अलिकडच्या काळात लहान मुलांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या मृत्यू होण्याच्या घटना वारंवार कानावर पडत आहे.   नाशिकच्या भद्रकाली पोलीस   ठाण्यात अशाच एका घटनेची नोंद झाली आहे. दोन वर्षाच्या   लहान मुलाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घराच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या हौदात पडूनच दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये यापूर्वी देखील पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांचा कधी झोका खेळतांना फास लागून तर कधी बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील आठवड्यातच आठ महिन्यांच्या बाळाने नेलकटर गिळले होते. ही घटना ताजी असतानाच घराच्या बाजूला असलेल्या दोन वर्षीय चिमूरड्याचा हौदात पडून मृत्यू झाला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टाकळीरोड परिसरातील ही हृदयद्रावक घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास टाकळीरोड येथील पंचकृष्ण बंगला येथे ही दुर्दवी घटना घडली आहे.पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा आदी हे रमेश चव्हाण यांच्यासोबत राहतात. मुल...

दारुड्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या.

पुणे प्रतिनिधी: मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. माधुरी सुशांत वाघमारे (वय.२३ )   रा. मुंजाबा वस्ती , धानोरी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. माधुरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती सुशांत वाघमारे याच्यासह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माधुरीचे वडील आनंदा कांबळे (वय.४८ ) रा. निवृत्ती हाईट , एनडीए रस्ता , उत्तमनगर यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधुरीचा चार महिन्यांपूर्वी सुशांत याच्याशी विवाह झाला होता. सुशांत तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. त्याला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो तिला मारहाणही करायचा. माधुरीची सासू तिला स्वयंपाकावरुन टोमणे मारत होती. छळामुळे माधुरी माहेरी आली. तिने निवृत्ती हाईट इमारतीच्या छतावरुन उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या माधुरीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पती तसेच त्याच्या नातेवाईकांच्या छळामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे माधुरीचे वडील आनंदा कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे तप...

डेक्कन पोलीसांनी खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत २४ तासाच्या आत केले जेरबंद.

मंचर प्रतिनिधी: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लाकडी पूल व झेड ब्रिजच्यामध्ये मुठा नदीच्या बाजूला परिसरात अनोळखी इसमाला जखमी करून खून करण्यात आला.यावेळी डेक्कन पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत २४ तासाच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या.याप्रकरणी मयत इसमाच्या वडिलांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लाकडी पूल व झेड ब्रिजच्यामध्ये मुठा नदीच्या बाजूला असलेल्या नदीपात्र जवळील परिसरात अनोळखी इसम बेशुद्ध व जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली.सदर माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे व डेक्कन पोलीस स्टाफ माहिती मिळालेल्या ठिकाणी रवाना झाले.सदर इसमास कोणीतरी अज्ञात लोकांनी धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारले आहे.मयत झालेल्या इसमास व मारेकरी यांना प्रत्यक्षात पाहणारे साक्षीदार व सीसीटीव्हीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.१) नरेश गणेश दळवी (वय.३० वर्ष), २) अजय शंकर(वय.२५ वर्ष), समीर कैलास कारके (वय...

भिमाशंकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी महिला संरक्षण कायदे व निर्भया पथक जनजागृती बाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले.

मंचर प्रतिनिधी: भीमाशंकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या   वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चा आंबेगाव अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्यावतीने विद्यार्थी यांना महिला संरक्षण कायदे व निर्भया पथक जनजागृती बाबत व्याख्यान आयोजित केले होते. यास प्रमुख व्याख्याते म्हणून मंचर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली पवार मॅडम व मयुरी तुरे मॅडम उपस्थित होते. यावेळी पी.एस.आय.पवार मॅडम यांनी सायबर गुन्हे , आर्थिक फसवणूक गुन्हे माहिती, महिलांसाठी असणारे कायदे गुन्हे तपास करताना येणारे अनुभव, महाविद्यालतील विद्यार्थी यांस पोलीस प्रशासन यांचे   महिलांसाठी राबविणारे नवनवीन उपक्रम बाबत माहिती दिली. पी.एस.आय.मयुरी तुरे मॅडम यांनी महिलांसाठी असणारे कायदे भारतीय दंड संहिता व शिक्षा निर्भया पथक यांची कामे व महिला सक्षमीकरण बाबत माहिती दिली. विद्यार्थी यांनी पी.एस.आय. पवार मॅडम व तुरे मॅडम यांच्याबरोबर विविध प्रश्न व उत्तरे असा मनमोकळा संवाद साधला. यावेळी डॉ. ताराचंद कराळे यांनी जीवनामध...

पिंपळगाव घोडे येथील विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली

 घोडेगाव प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथीलशाळेतील  विद्यार्थ्यांची गिरवली येथील आयुका केंद्रावर अभ्यास दौर्यासाठी गेले असता. बस क्र. MH 14 CW 3553 दरीत कोसळली असून अनेक विद्यार्थी  आणि शिक्षक हे देखील जखमी आहेत. जखमींना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन  जखमींचा आकडा अद्याप समजलेला नाही. अपडेट वा 4.54 अपघातील अनेक जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील सिध्दी हॉस्पिटल आणि मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. अपडेट वा.5.14 या बसमध्ये आठवी, नववी आणि दहावीचे जवळपास 45 विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांची बस जवळपास तीन वेळा उलटून 150 फूट खोल दरीत जाऊन सागाच्या झाडाला अडकली, दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये 3 विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. पुढील माहिती याचं बातमीमध्ये अपडेट केली जाईल. अपडेटेड माहितीसाठी याच लिंकला बातमी पहा.

घरगुती सिलेंडरमधून वायू गळती होऊन स्फोट.

  पुणे प्रतिनिधी: घरगुती सिलेंडरमधून वायू गळती झाल्याने स्फोट होत आग लागल्याची घटना घडली. आज पहाटे नऱ्हे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी तळमजल्यावरील घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत घरातील महिला जखमी झाली आहे. चैत्राली ईश्वर मांढरे असं २९ वर्षीय महिलेचं नाव आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायू गळती असणारा सिलेंडर सुरुवातीला बाहेर काढला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने जवानांनी पाण्याचा मारा करत घरातील वस्तूंना लागलेली आग पसरु न देता पूर्ण विझवली त्यामुळे मोठा धोका टळला आहे.   या घटनेत घराचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचवेळी जवानांनी घरातील रिकामे दोन सिलेंडर बाहेर काढले आणि सुरक्षेच्या कारणास्तव वायू गळती होत असलेला सिलेंडर ताब्यात घेतला. दलाची मदत पोहोचण्याआधी घरातील महिला ही आगीमुळे जखमी झाल्याने तिच्या पतीने तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते , अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन ...

एनआयएची छापेमारी, पीएफआयशी संबंधित पाच जणांना घेतल ताब्यात.

पुणे प्रतिनिधी: पुण्यातील कोंढवा परिसरात अलीकडेच ‘ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ’ च्या (पीएफआय) मुख्य कार्यालयावर एनआयए , एटीएसकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईनंतर आज पुन्हा कोंढवा परिसरात तपास यंत्रणांमार्फत छापा टाकण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद , सोलापूरनंतर पुण्यातही राष्ट्रीय तपास यंत्रणेनं मोठी कारवाई केली आहे. देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथील ‘ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ’ या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने ‘ पीएफआय ’ संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये पीएफआय संघटनेचे माजी राज्य सरचिटणीस रझी खान आणि अब्दुल कय्युम शेख या दोघांना अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होतं. त्यावेळी दोघांकडून काही साहित्यही जप्त केले होते. या कारवाईनंतर केंद्र सरकारच्या निषेधार्थ पीएफआय संघटनेकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मात्र , यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केली. याप्रकरणी पुणे पोलिसां...

शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मंचर ही आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसांची संस्था - ॲड.अविनाश रहाणे.

मंचर प्रतिनिधी: मंचर येथील शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने आठ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला आहे.रौप्यमहोत्सवी वर्षात पतसंस्था विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष शांताराम जाधव यांनी दिली. मंचर येथील शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शांताराम बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी विद्यालया शेजारील मंगलमुर्ती लॉन्स कार्यालयात पार पडली . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी पतसंस्थेचे संस्थापक ॲड.अविनाश रहाणे , संचालक सुनील बाणखेले , सुरेश चव्हाण , संदीप गुंजाळ , संतोष डोके , रवींद्र सोनवणे , माधवी अविनाश रहाणे , विजया सुहास चव्हाण , दिनकर रोकडे , मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार , सल्लागार अरुण नाना बाणखेले , गणपतराव कराळे , दत्तात्रय खानदेशे , लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले, वि.वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन अरूण लोंढे , संचालक दत्तात्रय माशेरे , उत्तम शेठ भेके , दिनेश बाणखेले , कायदेविषयक सल्लागार विलास शेटे , पत्रकार सदानंद शेवाळे , धर्मवीर संभाजी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी शं करराव पिंगळे , भि...