इंग्रजी मिडीयम आश्रमशाळा घोडेगाव येथील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्व याबाबत मार्गदर्शन .
घोडेगाव प्रतिनिधी:
शासकीय इंग्रजी मिडीयम आश्रमशाळा घोडेगाव या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्या वतीने पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्व या बाबत व्याख्यान आयोजित केले होते. जुन्नर तालुक्यातील वनविभागाचे वनरक्षक मा सैनिक रमेश खरमाळे यांनी पशु प्राणी यांचे महत्व, मधमाशी मानवी जीवनातील महत्व, जंगलमधील विविध वनऔषध वनस्पती, सहयाद्री खोरे निसर्ग समतोल कसा राखावा, मानव व बिबटे यांचा संघर्ष, झाडे लावा झाडे जगवा या बाबत जनजागृती उपयुक्त माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवर शुभहस्ते भारतीय सरकारच्या संरक्षण दलात अतुलनीय योगदान दिलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे, अटल संस्था संस्थापक संदीप बाणखेले, संजय नांगरे, अटल संस्था सचिव गणेश बाणखेले, सरचिटणीस गणेश काळे, आयटीसेलचे अध्यक्ष प्रसाद खोल्लम, सरचिटणीस अशोकराव गभाले, घोडेगाव शहराध्यक्ष सागर घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यदूत सुशांत थोरात व आभार प्राचार्य नाईकडे सर यांनी मानले.