हिरकणी विद्यालय गावडेवाडी या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्यावतीने विद्यार्थिनींना किशोरवयीन मुलींमधील विकार व जनजागृती बाबत व्याख्यान आयोजित केले होते.
उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील वैद्यकीय अधिकारी व स्त्री रोग तज्ञ डॉ. आरती यांनी किशोर अवस्था म्हणजे काय व त्यात होणारे शारीरिक बदल, मुलींनी आपले छंद जोपासणे, सकस आहार, गुड टच बॅड टच, डॉक्टर, आई, सिस्टर यांना सोबत मनमोकळे बोलले पाहिजे, तंत्रज्ञान याचा उपयोग बदलत्या जीवनमान पध्दत असे उपयुक्त मार्गदर्शन केले या वेळी सर्व उपस्थित पुरुष मान्यवर यांनी उद्घाटन व प्रास्ताविक करून महिला शिक्षक व महिला डॉक्टर यांच्याकडे कार्यक्रम हस्तांतरित केला.
सर्व विद्यार्थीनीनी डॉ भारती यांच्या बरोबर विविध प्रश्न व उत्तरे असा मनमोकळा संवाद साधला उपस्थित मान्यवर शुभहस्ते भारतीय सरकारच्या संरक्षण दलात अतुलनीय योगदान दिलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा.डॉ.ताराचंद कराळे, सरपंच स्वरूपा ताई गावडे डॉ पूजा कोळेकर प्राचार्य मा.बोंबले सर, ग्रा.प. सदस्य एकनाथ गावडे,श्यामकांत शिंदे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मेघशाम उर्फ बंटीशेठ भोर भाजपा आयटीसेलचे अध्यक्ष प्रसाद खोल्लम,भाजपा अवसरी खुर्द शहराध्यक्ष स्वप्निल इंदोरे, रंगनाथ हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यदूत सुशांत थोरात व आभार दहितुले मॅडम यांनी मानले.