समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
पतीच्या जाचाला
कंटाळून विवाहित
तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना
अकोला जिल्ह्याच्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील यावलखेड इथे घडली आहे.
दर्शना प्रशांत पवार (वय.२४ वर्ष) राहणार बालाजीनगर, कात्रज, पुणे. असे मृतक
विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. सध्या सासरकडील
सर्व मंडळी फरार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. मंगला अरुण सोळंके यांनी तक्रार
दिली. त्यानुसार, दर्शना हिचा
विवाह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशांत रामकृष्ण पवार रा. गायगाव, ता. शेगाव, ह.मु. बालाजीनगर, कात्रज
याच्याशी झाला. प्रशांत एका खाजगी कंपनीत पुण्यात कामाला असतो. सासरचेही
पुण्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे.
माहेरकडून
दर्शनाला सोने-चांदीचे दागिनेसह ४ लाख ५० हजाराचे भेट वस्तू लग्नात देण्यात आल्या.
नंतर दर्शना ही तिच्या पतीबरोबर पुणे इथे राहायला गेली. प्रशांत त्यांचे वडील
रामकृष्ण आणि आई नंदा पवार असे चौघेही एकत्र राहत होते. काही दिवस चांगले गेले.
नंतर मार्च २०२२ मध्ये छोट्या-छोट्या कारणांवरुन पती- सासरच्यांनी दर्शनाशी वाद
घालायला सुरुवात केली. तुझ्या आई-वडिलांनी लग्नांमध्ये पाहुण्यांची काही सोय केली
नाही. हलक्या दर्जाच्या वस्तू भेट दिल्या. तू खेळपट मुलगी आहे. असे वारंवार टोमणे
द्यायचे. अन् मारहाण करायचे, असे नेहमी
दर्शना फोनवर सांगायची. असेही तक्रारीत नमूद आहे. यासोबतचं तिला माहेरकडून १ लाख ५०
हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावलाय. त्यानंतर माहेरच्यांनी तिला घेऊन अकोल्याच्या
यावलखेडमध्ये घरी आणले. तेव्हा तिने झालेला पूर्ण त्रास माहेरच्यांना सांगितला.
प्रशांत पवार व सासरच्यांनी नेहमी दर्शनाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला घरून पैसे आणण्यासाठी नेहमी तगादा लावला जात होता. शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकीही दिल्या जायाची. तिने तिच्या माहेरच्या लोकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. मात्र माहेरच्यांनी आज ना उदया तिला सासरचे नांदवतील. परिस्थिती सुधारेल, या आशेने तिला समजावून सांगायचे. परंतु दर्शनाचा त्रास कमी न होता वाढत गेला. सासरचे तिला नेहमी नव-नवीन डिमांड करीत राहिले. दर्शना माहेरी असता तिला फोनव्दारे तुला वागवत नाही. प्रशांत दुसरे लग्न करेल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळचं दर्शनाने आता आत्महत्याचं पाऊल उचललंय. बोरगाव मंजू पोलिसांनी पंचनामा केला. तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.