प्रतिनिधी:समीर गोरडे, पारगाव शिंगवे
पारगाव पोलीस
ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करुन याहीवर्षी गणेशोत्सव
साजरा करावा तसेच गणेश मंडळांनी डी जे डॉल्बी न लावता मिरवणुका काढाव्यात अशा
सुचना अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी केल्या.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पी.एस.आय. भाऊसाहेब लोकरे, पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, प्रवीण वाळुंज, शिरीशकुमार रोडे, तसेच बावीस गावातील मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश उत्सवात पारंपारिक वाद्यांच्या वापर करावा, गणेशमूर्तीच्या स्थापनेनंतर स्वयंसेवकांची नियुक्ती करुन पावित्र्य राखावे, वाहतुकीला अडथळा होणार नाही,याची खबरदारी मंडप उभारण्यात यावा.गणेशोत्सवासाठी मंडळांनी पोर्टलवरुन ऑनलाईन परवानगी घ्यावी.वर्गणीसाठी कोणालाही सक्ती करण्यात येऊ नये.विसर्जन मिरवणूक वेळेवर सांगता करावी.