समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मस्के हे
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान नेहमीप्रमाणे ते आपल्या घरून
पोलीस मुख्यालय येथे हजेरीसाठी जात होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाजवळ तिन मुली त्यांच्याजवळ आल्यात. तसेच
आम्हाला काही गुंड स्वरूपाचे मुलं मारहाण करत असून, आमची गाडी सुद्धा त्यांच्याजवळ असल्याचं म्हणाल्यात. त्यामुळे मस्के
यांनी मदतीसाठी ११२ नंबर डायल करण्याचा त्यांना सल्ला दिला. तेवढ्यात मारहाण
करणारी मुले सुद्धा तिथे पोहचली.
या मुलींना तू मदत करणार का आणि पोलिसांना फोन करायला सांगतो का? म्हणत मारहाण करायला लागले. यावेळी आपण पोलीस असल्याच मस्के यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांना मारहाण सुरूच होती. मस्के यांना खालीपाडून लाथा बुक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे मस्के यांनी कशीबशी आपली सुटका करून तेथून पळ काढत बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठलं.