समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
२६ ऑगस्ट २०२२ रोजी चास, ता-आंबेगाव, येथील स्मशानभूमिच्या परिसरात एक लहान मुलगा गेली ४ ते ५ दिवस एकटाच राहत असल्याचे लोकांच्या निदर्शानास आले त्यानुसार चास येथील समाजसेवक धनेश मारुती चासकर, सचिन ज्ञानेश्वर मानकर, संकेत दत्तात्रय बारवे, विक्रम शेगर, वैभव भोर यांनी तिथे जाऊन पहिले असता तो लहान मुलगा अन्न पाण्याविना त्याला झोपलेला अवस्थेत असल्याचे आढळून आले व त्यांनी त्याला जवळील हॉटेल मध्ये जेवण खाऊ घातल्या नंतर चौकशी केली असता त्याला त्याचे नाव, गाव काहीही सांगता आले नाही. त्यानंतर या सर्वांनी शोधा- शोध केली असता कुठेही त्या मुलाच्या कुटुंबीयांची कुठलीही ओळख पटली नाही त्यानंतर चास मधील धनेश चासकर यांनी त्याला त्यांच्या घरी नेले व चार दिवास त्याचा चांगल्याप्रकारे संभाळ केला व गेली ४ दिवस धनेश चासकर, सचिन मानकर, संकेत बारवे, विक्रम शेगर, वैभव भोर यांनी पंचक्रोशित जाऊन दिवसभर शोधा- शोध केल्यानंतर २९ ऑगस्ट ला माहिती मिळाली की त्या लहान मुलाची ओळख पटली आहे. व ते कामासाठी मोलमजुरी करण्यासाठी ते कुठेही जात असतात व तो तिथून सायकल खेळता खेळता अनोळखी ठिकाणी गेला व चुकला अशी माहिती मिळाली त्यानुसार त्या लहान मुलास त्यांच्या आजी आजोबाकडे सुपूर्त करण्यात या चासमधील युवकांना यश आले आहे.