प्रतिनिधी - समीर गोरडे,पारगाव शिंगवे
आंबेगाव तालुक्यातील मंचर अभियांत्रिकी
महाविद्यालय व पारगाव कारखाना एपीएमपीएल बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी
पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी निवेदनाद्वारे माजी गृहमंत्री दिलीप
वळसे पाटील यांच्याकडे केली आहे .
लॉकडाऊनच्या काळात पीएमपीएलने मंचर ते अवसरी खुर्द अभियांत्रिकी महाविद्यालय व पारगाव साखर कारखाना अशी बस सेवा सुरू केली होती. मात्र कमी उत्पन्न मिळते अशी सबब देऊन ही बस सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे पुण्याला रोज येजा करणारे प्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी रुग्ण व प्रवासी वर्ग यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. ही बस सेवापूर्वक सुरू करण्याचे आदेश माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी पीएमपीएल प्रशासनाला द्यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली अस्वारे व पारगाव ग्रामस्थ उपस्थित होते.