पुणे प्रतिनिधी:
जमीन खरेदी व्यवहारात गुंतवलेली रक्कम तसेच हातउसने दिलेले ६१ लाख ५०
हजार रुपये परत न केल्याने एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना
येरवडा भागात घडली. व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पाच
जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजयकुमार विरदीचंद वेदमुथा रा. शास्त्रीनगर, येरवडा असे आत्महत्या
केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. वेदमुथा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी
हेमंत मोहनलाल भंडारी (वय. ६० वर्ष), मोनीश हेमंत भंडारी (वय.२२ वर्ष) रा. राजगुरूनगर, जि. पुणे, आरती मोनीश भंडारी (वय.२८ वर्ष), हर्षल मदनलाल बलदोटा (वय. ४५ वर्ष) रा. आदिनाथ सोसायटी, पुणे-सातारा रस्ता, किरण पवार (वय २७ वर्ष) रा. राजगुरुनगर, जि. पुणे यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत
वेदमुथा यांची पत्नी प्रतिमा अजयकुमार बेदमुथा (वय.४० वर्ष) यांनी येरवडा पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजयकुमार वेदमुथा यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली
होती. भंडारी यांना वेदमुथा यांनी हातउसने पैसे दिले होते.
जमीन व्यवहारात जमीन मालकास वेदमुथा यांनी काही रक्कम दिली होती. आरोपींनी जमीनमालकाकडून परस्पर ही रक्कम घेतली होती. आर्थिक व्यवहारात वेदमुथा ६१ लाख ५० हजार रुपये यांना परत करण्यात आली. आर्थिक व्यवहारातील तोटा तसेच नैराश्यातून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींनी फसवणूक केल्याने पतीने आत्महत्या केल्याचे वेदमुथा यांची पत्नी प्रतिमा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर करीत आहेत.