Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

६ वर्षाचा हरवलेला मुलगा त्यांच्या आजी आजोबांकडे पोहचविण्यात आले यश

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: २६ ऑगस्ट २०२२ रोजी चास, ता-आंबेगाव, येथील स्मशानभूमिच्या परिसरात एक लहान मुलगा गेली ४ ते ५ दिवस एकटाच राहत असल्याचे लोकांच्या निदर्शानास आले त्यानुसार चास येथील समाजसेवक धनेश मारुती चासकर, सचिन ज्ञानेश्वर मानकर, संकेत दत्तात्रय बारवे, विक्रम शेगर, वैभव भोर यांनी तिथे जाऊन पहिले असता तो लहान मुलगा अन्न पाण्याविना त्याला झोपलेला अवस्थेत असल्याचे आढळून आले व त्यांनी त्याला जवळील हॉटेल मध्ये जेवण खाऊ घातल्या नंतर चौकशी केली असता त्याला त्याचे नाव, गाव काहीही सांगता आले नाही. त्यानंतर या सर्वांनी शोधा- शोध केली असता कुठेही त्या मुलाच्या कुटुंबीयांची कुठलीही ओळख पटली नाही त्यानंतर चास मधील धनेश चासकर यांनी त्याला त्यांच्या घरी नेले व चार दिवास त्याचा चांगल्याप्रकारे संभाळ केला व गेली ४ दिवस धनेश चासकर, सचिन मानकर, संकेत बारवे, विक्रम शेगर, वैभव भोर यांनी पंचक्रोशित जाऊन दिवसभर शोधा- शोध केल्यानंतर २९ ऑगस्ट ला माहिती मिळाली की त्या लहान मुलाची ओळख पटली आहे. व ते कामासाठी मोलमजुरी करण्यासाठी ते कुठेही जात असतात व तो तिथून सायकल खेळता खेळता अनोळखी ठिकाणी गेला व चुकला अ...

बनावट मृत्यूपत्र तयार करुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न ;पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल.

पुणे प्रतिनिधी :   जमिनीचे वारसदार हयात असताना त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. दिलीप नटवरलाल कोटक रा. चिंचवड यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रतापचंद भाबूतमालजी मारवाडी रा. साई कॉलनी , कर्वेनगर यांच्यासह दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोटक कुटुंबियांच्या मालकीची वाघोली परिसरात जमीन आहे. आरोपींनी कोटक आणि त्यांचे नातेवाईक जिवंत असताना ते मृत झाल्याचे बनावट मृत्युपत्र प्रमाणपत्र तयार केले. तसेच आरोपींनी स्वत: वारसदार असल्याचे भासवून दिवाणी न्यायालयातून बनावट वारस प्रमाणपत्र मिळवले. जमिनीचे कुलमुखत्यार दस्त तयार केले. त्यांनी कोटक कुटुंबियांची आणि शासनाची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला , अशी माहिती पोलिसांनी दिली.

बांधकाम व्यावसायिकाची तब्बल सहा कोटींची फसवणूक; माजी नगरसेवकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल.

पुणे प्रतिनिधी: बांधकाम करारानुसार पाच कोटी ३५ लाख आणि हात उसने घेतलेले ५२ लाख ६५ हजार रुपये परत न करता प्रकल्पातील सदनिकेची परस्पर विक्री करून गुंडांमार्फत गाळ्यांचा ताबा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी माजी नगरसेवकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक फारूख यासीन सय्यद इनामदार (रा. महम्मदवाडी) , अफान इनामदार आणि अमितकुमार सिन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक राहुल प्रेमप्रकाश गोयल (वय ३८ वर्ष) रा. ढोले पाटील रोड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोयल बांधकाम व्यावसायिक आहेत. फारुख इनामदार यांच्या मालकीची जमीन विकसनासाठी गोयल यांना देण्यात आली होती. आरोपींनी गोयल यांना विकास हस्तांतरण हक्क ( टीडीआर) विकत घेऊन न दिल्यामुळे बांधकामास विलंब होऊन गोयल यांचे आर्थिक नुकसान झाले. गोयल यांनी पुणे महापालिकेकडे वाढीव चटई क्षेत्र खरेदीसाठी अर्ज केला. अर्ज मंजूर झाल्यानंतर आरोपी महापालिकेत गेले आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत घेतली. गोयल यांच्या कामात अडथळा निर्माण करुन त्यांची फसवण...

खड्ड्यामुळे तोल गेला, टँकरच्या मागच्या चाकाखाली गेल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:   रस्त्यावरील खड्ड्यामुळे आणखी एका तरुणाचा जीव गेलाय. ही थरारक घटना   सीसीटीव्ही   कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल गेला. समोरुन येत असलेल्या टँकरच्या मागच्या चाकाखाली हा तरुण चिरडला गेला. यामुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिवा आगासन रोडवर झालेल्या या अपघातमुळे एकच खळबळ उडाली होती. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातातली मृत तरुणाचं नाव गणेश पाले असं आहे. या अपघातानंतर पालिका प्रशासन , सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यावर आरोप केला जातोय. युवकाच्या अपघाती मृत्यूला तेच जबाबदार असल्याची टीका केली जातेय. त्यामुळे या सगळ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खूर्चनही रस्त्यावरील खड्डे काही कमी होत नाहीत. उलट दरवर्षी खड्ड्यामुळे अनेकांना जीव गमावाला लागतोय. त्यामुळे याप्रकरणी प्रशासन गांर्भीयाने केव्हा लक्ष घालणार , असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. चाळण झालेल्या या रस्त्यावर मृत्यूचे...

कारखाना बस पूर्ववत सुरू करावी - विठ्ठल ढोबळे.

प्रतिनिधी - समीर गोरडे , पारगाव शिंगवे आंबेगाव तालुक्यातील मंचर अभियांत्रिकी महाविद्यालय व पारगाव कारखाना एपीएमपीएल बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी निवेदनाद्वारे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे . लॉकडाऊनच्या काळात पीएमपीएलने मंचर ते अवसरी खुर्द अभियांत्रिकी महाविद्यालय व पारगाव साखर कारखाना अशी बस सेवा सुरू केली होती. मात्र कमी उत्पन्न मिळते अशी सबब देऊन ही बस सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे पुण्याला रोज येजा करणारे प्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी रुग्ण व प्रवासी वर्ग यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. ही बस सेवापूर्वक सुरू करण्याचे आदेश माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी पीएमपीएल प्रशासनाला द्यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली अस्वारे व पारगाव ग्रामस्थ उपस्थित होते.    

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: पतीच्या जाचाला कंटाळून   विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या   केली. ही घटना अकोला जिल्ह्याच्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील यावलखेड इथे घडली आहे. दर्शना प्रशांत पवार ( वय.२४ वर्ष) राहणार बालाजीनगर , कात्रज , पुणे. असे मृतक विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. सध्या सासरकडील सर्व मंडळी फरार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. मंगला अरुण सोळंके यांनी तक्रार दिली. त्यानुसार , दर्शना हिचा विवाह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशांत रामकृष्ण पवार रा. गायगाव , ता. शेगाव , ह.मु. बालाजीनगर , कात्रज याच्याशी झाला. प्रशांत एका खाजगी कंपनीत पुण्यात कामाला असतो. सासरचेही पुण्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. माहेरकडून दर्शनाला सोने-चांदीचे दागिनेसह ४ लाख ५० हजाराचे भेट वस्तू लग्नात देण्यात आल्या. नंतर दर्शना ही तिच्या पतीबरोबर पुणे इथे राहायला गेली. प्रशांत त्यांचे वडील रामकृष्ण आणि आई नंदा पवार असे चौघेही एकत्र राहत होते. काही दिवस चांगले गेले. नंतर मार्च २०२२ म...

आर्थिक फसवणुकीमुळे व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या.

पुणे प्रतिनिधी: जमीन खरेदी व्यवहारात गुंतवलेली रक्कम तसेच हातउसने दिलेले ६१ लाख ५० हजार रुपये परत न केल्याने एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अजयकुमार विरदीचंद वेदमुथा रा. शास्त्रीनगर , येरवडा असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. वेदमुथा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हेमंत मोहनलाल भंडारी (वय. ६० वर्ष) , मोनीश हेमंत भंडारी (वय.२२ वर्ष)   रा. राजगुरूनगर , जि. पुणे , आरती मोनीश भंडारी (वय.२८ वर्ष) , हर्षल मदनलाल बलदोटा (वय. ४५ वर्ष) रा. आदिनाथ सोसायटी , पुणे-सातारा रस्ता , किरण पवार (वय २७ वर्ष)   रा. राजगुरुनगर , जि. पुणे यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वेदमुथा यांची पत्नी प्रतिमा अजयकुमार बेदमुथा (वय.४० वर्ष) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजयकुमार वेदमुथा यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. भंडारी यांना वेदमुथा यांनी हातउसने पैसे दिले होते. जमीन व्यवहारात जमीन मालकास वेदमुथा ...

चांडोली बुद्रुक येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित.

चांडोली प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मंचर भाग शाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे साहेब , आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे सर , अटल बिहारी वाजपेयी विचार मंच उपाध्यक्ष गणेश भाऊ बाणखेले , आरोग्यदूत सुशांत थोरात , विद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ काळे सर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक मुख्याध्यापिका आजाब मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या स्पर्धा परीक्षांची रूपरेषा स्पष्ट करताना या परीक्षांची पूर्वतयारी शालेय स्तरापासूनच करावी , तसेच विविध खेळांमध्ये सहभाग घ्यावा , राज्य , राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना प्रशासनात काम करण्यासाठी संधी मिळते , विद्यार्थ्यांनी चांगली स्वप्न पहावीत व ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी कठोर ...

पी एम किसान लाभार्थींना ई - के वाय सी करण्याचे आवाहन-तालुका कृषी अधिकारी .

प्रतिनिधी : समीर गोरडे , शिंगवे पारगाव पी एम किसान लाभार्थींना महत्वाची सूचना आहे की येत्या ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सर्वांनी ई - के वाय सी करणे बंधनकारक असून ज्यांचे कुणाचे प्रलंबित राहील त्यांना येणारा पुढील हप्त्याचा लाभ भेटणार नाही. असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ कृषी अधिकारी , कृषी पर्येक्षक व कृषी सहायक आपल्या कार्यक्षेत्रात प्रचार प्रसिध्दी व ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावून करत आहेत. तरी सर्व लाभार्थीना विनंती आहे की त्यांनी पी एम किसान पोर्टल वरून आधार लिंक मोबाईल ओ टी पी द्वारे स्वतः करून घ्यावे किंवा जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन करून घ्यावे.

किशोरवयीन मुलींसाठी भाजपाच्या वतीने आरोग्य शिबीर

हिरकणी विद्यालय गावडेवाडी या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्यावतीने विद्यार्थिनींना किशोरवयीन मुलींमधील विकार व जनजागृती बाबत व्याख्यान आयोजित केले होते.  उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील वैद्यकीय अधिकारी व स्त्री रोग तज्ञ डॉ. आरती यांनी किशोर अवस्था म्हणजे काय व त्यात होणारे शारीरिक बदल, मुलींनी आपले छंद जोपासणे, सकस आहार, गुड टच बॅड टच, डॉक्टर, आई, सिस्टर यांना सोबत मनमोकळे बोलले पाहिजे, तंत्रज्ञान याचा उपयोग बदलत्या जीवनमान पध्दत असे उपयुक्त मार्गदर्शन केले या वेळी सर्व उपस्थित पुरुष मान्यवर यांनी  उद्घाटन व प्रास्ताविक करून महिला शिक्षक व महिला डॉक्टर यांच्याकडे कार्यक्रम हस्तांतरित केला. सर्व विद्यार्थीनीनी डॉ भारती यांच्या बरोबर विविध प्रश्न व उत्तरे असा मनमोकळा संवाद साधला उपस्थित मान्यवर शुभहस्ते भारतीय सरकारच्या संरक्षण दलात अतुलनीय योगदान दिलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा.डॉ.ताराचंद कराळे, सरपंच स्वरूपा ताई गावडे डॉ पूजा कोळेकर  प्राचार्य मा.बोंब...

सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे.

प्रतिनिधी:समीर गोरडे, पारगाव शिंगवे पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करुन याहीवर्षी गणेशोत्सव साजरा करावा तसेच गणेश मंडळांनी डी जे डॉल्बी न लावता मिरवणुका काढाव्यात अशा सुचना अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी केल्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , आंबेगाव तहसिलदार रमा जोशी , सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे , पी.एस.आय. भाऊसाहेब लोकरे, पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे , प्रवीण वाळुंज , शिरीशकुमार रोडे , तसेच बावीस गावातील मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश उत्सवात पारंपारिक वाद्यांच्या वापर करावा , गणेशमूर्तीच्या स्थापनेनंतर स्वयंसेवकांची नियुक्ती करुन पावित्र्य राखावे , वाहतुकीला अडथळा होणार नाही , याची खबरदारी मंडप उभारण्यात यावा.गणेशोत्सवासाठी मंडळांनी पोर्टलवरुन ऑनलाईन परवानगी घ्यावी.वर्गणीसाठी कोणालाही सक्ती करण्यात येऊ नये.विसर्जन मिरवणूक वेळेवर सांगता करावी.

इंग्रजी मिडीयम आश्रमशाळा घोडेगाव येथील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्व याबाबत मार्गदर्शन .

घोडेगाव प्रतिनिधी: शासकीय इंग्रजी मिडीयम आश्रमशाळा घोडेगाव या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्या वतीने पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्व या बाबत व्याख्यान आयोजित केले होते. जुन्नर तालुक्यातील वनविभागाचे वनरक्षक मा सैनिक रमेश खरमाळे यांनी पशु प्राणी यांचे महत्व, मधमाशी मानवी जीवनातील महत्व, जंगलमधील विविध वनऔषध वनस्पती, सहयाद्री खोरे निसर्ग समतोल कसा राखावा, मानव व बिबटे यांचा संघर्ष, झाडे लावा झाडे जगवा या बाबत जनजागृती उपयुक्त माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवर शुभहस्ते भारतीय सरकारच्या संरक्षण दलात अतुलनीय योगदान दिलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे , अटल संस्था संस्थापक संदीप बाणखेले, संजय नांगरे, अटल संस्था सचिव गणेश बाणखेले, सरचिटणीस गणेश काळे, आयटीसेलचे अध्यक्ष प्रसाद खोल्लम , सरचिटणीस अशोकराव गभाले, घोडेगाव शहराध्यक्ष सागर घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यदूत सुशांत थोरात व आभार प्राचार्य नाईकडे सर यांनी मानले.

राज्यात नवं समीकरण, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती - उद्धव ठाकरेंची घोषणा.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: दुभंगलेली   शिवसेना   आणि भाजप-शिंदेसेनेला वाढता पाठिंबा अशा स्थितीत राज्यात एक महत्त्वाचं समीकरण उदयाला आलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे , पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी , व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे , असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे - या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर प्रादेशिक पक्ष चिरडून टाकणं यालाच लोकशाही मानणारे लोकं बेताल वागत आहेत. येत्या काही काळात सुप्रीम कोर्टात जो लढा सुरु आहे , हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचाच आहे असे नाही....

वॉचमनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पती-पत्नीच्या प्रतिकाराने चोरट्यांचा डाव फसला.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: नाशिक - पुणे महामार्गावरील पळसे शिवारातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी येथील वॉचमनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वॉचमनच्या पत्नीने आरडाओरड केली असता चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जवळच राहत असलेले व रात्रीच्या वेळी वॉचमन काम करणारे दिनकर कोंडाजी गायधनी (वय.५७ वर्ष) यांनी त्या तिघा जणांना हटकले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तसेच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या आवाजामुळे त्यांची पत्नीही गाढ झोपेतून जागी झाली. पतीला तीघे बेदम मारहाण करत असल्याचे बघून तिने आरडाओरडा करत प्रतिकार केला. डोळ्यात मिरचीची पूड टाकूनसुद्धा वॉचमन व त्याच्या पत्नीने चोरट्यांना एटीएममध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यांना तीव्र विरोध केल्याने चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला.   आजुबाजूच...

आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची भावूक पोस्ट

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश समाज माध्यमांवर चर्चेत असतात. त्यांच्या विविध पोस्टमुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट अनेकांना प्रेरणा देतात. मात्र आता त्यांच्या पोस्टमुळे अनेकांना भावूक केलं आहे. कृष्ण प्रकाश यांच्या आईचं निधन झालं आहे. त्याबाबात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पााची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसातही तू बाप्पाला जवळ ठेवलंस. आता गणपती काही दिवसांवर आले आहेत. अश्यात तू गेलीस. हे सगळं मला अपेक्षित नव्हतं. तुझ्याशिवाय मी काहीच नाही, असं कृष्णप्रकाश यांनी म्हटलंय. माझी आई गेली. तिच्या विना मी भिकारी आहे, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलंय. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, आईचं निधन झालं अन् मी पोरका झालो, भिकारी झालो, असं कृष्णप्रकाश म्हणाले. “आई नेहमी आपल्यासोबत असते, आधी आपल्या आयुष्यात, नंतर कायमची आपल्या आठवणीत राहाते जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा आपल्याला स्वर्गात एक देवदूत मिळतो जो आपल्यावर लक्ष ठेवतो. मी माझ्या आईला गमावलं आहे. याचं दुख्: मी...

जुन्या भांडणाच्या रागातून महिलेचा निर्दयीपणे खून.

पुणे प्रतिनिधी: जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला डोक्यात हत्याराचे वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे हा प्रकार घडला. मृत महिलेचा मृतदेह ऊस आणि बाजरी असणाऱ्या शेताच्या बांधावर आढळून आला. याप्रकरणी एका व्यक्तीवर वालचंद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता पांडुरंग वाघमारे (वय.४५ वर्ष) रा. वडजल , ता. माण , जि. सातारा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बाळू साठे रा. जांब , ता. इंदापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , २३ ऑगस्टच्या रात्री दहाच्या दरम्यान संगीता वाघमारे तसेच महेंद्र मच्छिंद्र गायकवाड यांच्यात वाद झाला होता. यावेळी संगीता यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली होती. या भांडणाच्या कारणावरून गायकवाड याचा नातेवाईक अक्षय साठे याने संगीता यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले. या हल्ल्यामध्ये संगीता गंभीर जखमी झाल्या. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात...

धाडसी दरोड्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुणे प्रतिनिधी:  सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरच्या श्री गणेश ज्वेलर्सवर चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना काल रात्री घडली आहे. ज्वेलर्ससह शेजारच्या सलून दुकानात गोळीबार करत, दुकानातील काचांची तोडफोड करत सोनं लुटून तिथून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोड्याची सर्व थरारक आणि अंगावर काटा आणणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मागच्याच आठवड्यात याचं परिसरातील एटीएम, चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील जवळपास 8 लाखांची कॅश लंपास केली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात हा सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथे श्री गणेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात काल रात्री 9 च्या सुमारास 5-6 दरोडेखोर हत्यारे घेऊन घुसले. चोरट्यांनी दुकानात उपस्थित दुकान मालक आणि नोकराला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोने लुटले. सर्व दरोडेखोर हातात कोयता, बंदुका घेऊन दहशत पसरवताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. लूट केल्यानंतर चोरट्यांनी हातालील कोयत्याने दुकानाच्या काचा फोडल्या. इतकेच नाही तर ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूला असलेल्...

दोन भामट्यांनी एका वृद्ध महिलेला घातला गंडा; ७ तोळे सोने आणि ३२ हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: अंबरनाथमध्ये दोन भामट्यांनी एका वृद्ध महिलेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुढे मोफत धान्यवाटप सुरू असल्याचा बहाणा करत या महिलेला चोरट्यांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात घडला. भामट्यांनी महिलेच्या अंगावरील ७ तोळे दागिने आणि ३२   हजार रुपयांची रोख रक्कम या भामट्यांनी चोरून नेली.   अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या सुनिता ठाणगे या ६२ वर्षीय महिलेकडून ७ तोळ्यांचे दागिने आणि ३२ हजारांची रोकड चोरट्यांनी लुटली आहे. सुनिता ठाणगे काल (गुरुवारी) सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या. तिथून त्यांनी ३२ हजार रुपयांची रोकड काढली. बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्या शिवाजी चौकातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या. भाजीपाला खरेदी करुन झाल्यानंतर त्या पुढे रिक्षा पकडण्यासाठी जात होत्या. त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्यानं सुनिता यांना पुढे एक गुजराती माणूस मोफत धान्यवाटप करत असल्याचं सांगितलं. मोफत धान्य घेण्यासाठी सुनिता त्या व्यक्तीसोबत गेल्या. हा अज्ञात इसम त्यांना अंबरनाथमधील सागर ज्वेलर्स , सॅमसंग शॉपच्या बाजूच्या...

गणेश फेस्टिव्हल २०२२ निमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन.

प्रतिनिधी:श्रीराम क्षीरसागर, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग गणेश फेस्टिव्हल २०२२ निमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे २   ते ४   सप्टेंबर या दरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या बैलगाडा मालकांना ३ लाख ५३ हजार रुपये रोख , सहा मोटरसायकली , २१ जुंपते बैलगाडे व तीन सोन्याच्या अंगठ्या असे भरघोस बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.नावनोंदणी रविवार दि. २८ रोजी होणार आहे. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात गणेशोत्सवात गणेश फेस्टिवल २०२२   साजरा केला जातो.यानिमित्त मागील सतरा वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे दोन वर्ष शर्यतीत खंड पडला.त्यानंतर यावर्षी भव्य स्वरूपात शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरणार आहे.शुक्रवार दि.२ ते रविवार दि. ४ सप्टेंबर यादरम्यान शर्यतीचा थरार रंगणार आहे.विजेत्या बैलगाडा मालकांना प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस आहे. तीनही दिवस फळीफोडसाठी प्रत्येकी एक मोटरसायकल...

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना अखेर अटक.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क : मुलींची छेड काढत असतांना त्यांना मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून , पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना शोधून काढले आहे. संदीप ज्योतीराम चव्हाण (वय.३२ वर्ष) रा. गांधीनगर , विकी नरसिंह रिडलोन (वय.३३ वर्ष) रा. गांधीनगर , हरिष अशोक चौधरी रा.बापूनगर असे या आरोपींची नावे आहेत. बेगमपुरा पोलीसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर सचिन मधुकर म्हस्के (वय.३२ वर्षे ) रा. पेठेनगर निसर्ग कॉलनी असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.   याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सचिन मस्के हे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान नेहमीप्रमाणे ते आपल्या घरून पोलीस मुख्यालय येथे हजेरीसाठी जात होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाजवळ तिन मुली त्यांच्याजवळ आल्यात. तसेच आम्हाला काही गुंड स्वरूपाचे मुलं मारहाण करत असून , आमची गाडी सुद्धा त्यांच्याजवळ असल्याचं म्हणाल्यात. त्यामुळ...

गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासाडी, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात , नाचणी , भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान , या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान , सध्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाच्या वतीनं केले जात आहेत. मात्र , नुकसान भरपाई मिळत नाही. पावसाळा सुरु झाल्यापासून गवे भात , नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. गव्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही शेतकन्यांनी जमीन पडीक ठेवली आहे. तर काहींनी पडीक जमिनीत काजू , आंबा कलमांची लागवड केली केली आहे. मात्र , गव्यांनी या कलमांचीही नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या लोक वस्तीतील भात शेतीतही गव्यांचे दर्शन होत आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. जिल्ह...