पुणे प्रतिनिधी:
पंधरा दिवसात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने
३० ते ३५ महिलांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर
पोलिसांकडून तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेने त्यांना एक लाख रुपये दिले होते –
आरती ठाकूर
उर्फ कृष्णाबेन, नाजमा
सय्यद, सुमेरा
सय्यद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने लष्कर
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लष्कर भागात राहायला आहेत.
त्यांची आरोपी ठाकूर, सय्यद
यांच्याशी ओळख झाली होती. आरोपी महिलांनी त्यांना पंधरा दिवसात रक्कम दुप्पट
करण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदार महिलेने त्यांना एक लाख रुपये दिले होते.
गुंतवणूक केलेली रक्कम आरोपी महिलांनी दुप्पट करुन दिली नाही. फसवणूक झाल्याचे
लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
चौकशीत आरोपी महिलांनी अशाच पद्धतीने ३० ते ३५ महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.