मंचर प्रतिनिधी:
अवसरी खुर्द(ता.आंबेगाव) या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे युवा मोर्चा शाखा उद्घाटन आमदार तथा युवा मोर्चा प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे साहेब व संघटन मंत्री सुनील कर्जतकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे, आंबेगाव तालुका भाजपा संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले,भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुशांत थोरात,आंबेगाव तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मेघश्याम भोर,शहरप्रमुख स्वप्नील इंदोरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे स्वागत केले. यावेळी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष मेघश्याम भोर यांनी अवसरी खुर्द गावाच्या विकासासाठी भरघोस निधी द्यावा अशी मागणी बावनकुळे साहेब यांच्याकडे केली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अवसरी खुर्द गावच्या विकासासाठी भरघोस निधी देणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.तसेच तालुक्यात युवकांचे संघटन वाढविण्यावर भर द्यावा असे त्यांनी सुचविले.यावेळी युवा नेते राहुल शिंदे यांनी सहका-यांसमवेत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.यावेळी भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैड,तालुका युवा मोर्चा पदाधिकारी विकास बाणखेले, भाजपा आयटी सेल प्रमुख प्रसाद खोल्लम, राहुल साळुंखे, ऋषिकेश शिंदे, डॅनी बो-हाडे, हेमंत चिखले, गणेश बाणखेले, सनी इंदोरे, मयूर भालेराव आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुशांत गाडे यांनी सदर दौऱ्याचे नियोजन केले. यावेळी सर्व युवा वॉरिअर्स उपस्थित होते. आंबेगाव तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मेघश्याम भोर यांनी सूत्रसंचालन केले तर स्वप्निल इंदोरे यांनी आभार मानले.