घोडेगाव प्रतिनिधी:
लांडेवाडी नारोडी फाटा येथील श्री भैरवनाथ
महाराज मंदिरात चोरट्यांनी चोरी केली असून भैरवनाथ मंदिरातील दान पेटीतील ५० हजार रुपये
रोख रक्कम चोरून नेली आहे.याबद्दल भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष बाबाजी हरिभाऊ हुले
रा.लांडेवाडी,नारोडी फाटा यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर माहिती अशी की,दिनांक २८ जुलै २०२२ रात्री १०.३० ते २९ जुलै २०२२ रोजी सकाळी ५.४६ वाजताच्या दरम्यान मौजे लांडेवाडी येथील पिंगळवाडी गावच्या हद्दीत असलेल्या भैरवनाथ महाराज मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.सदर चोरांनी मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या खिडकीचे स्टीलचे गज आणि काच फोडून मंदिरात प्रवेश केला.मंदिरातील दानपेटी मधील अंदाजे ५०,०००/-रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केली असून सदर अज्ञात चोरट्यांविरुद्ध भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष बाबाजी हरिभाऊ हुले यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलीस करत आहेत.