मंचर प्रतिनिधी:
चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक कारणावरून
पत्नीला वारंवार जबर मारहाण करणाऱ्या पतीवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.याबाबत मुस्कान सलमान सैय्यद (वय.२१ वर्ष)रा.मंचर ता.आंबेगाव हिने
फिर्याद दाखल केली आहे.तर सलमान हसन अब्बाज सैय्यद (वय.२७ वर्ष) रा.मंचर,ता.आंबेगाव याच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी
मुस्कान हिला तिचा पती सलमान वारंवार मारहाण करत असून या अगोदरही फिर्यादीला अनेक वेळा
शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे.दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सलमान यांनी मुस्कान
हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन व प्रापंचिक वादावरून तिला शिवीगाळ करत हाताने व
कमरेच्या बेल्टने मारहाण केली तसेच आरोपीने बाथरूम साफ करायचे हायड्रोक्लोरिक ऍसिडचे कॅन हातात घेऊन ते फिर्यादीच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न
केला परंतु फिर्यादीने प्रसंगावधान ठेवत त्यांनी त्यांची पाठ पुढे केली यामुळे ऍसिड,पाठीवर पडून पाठ लाल झाली आहे.
त्यानंतर सलमान पत्नी मुस्कान हिला त्याच्या गाडीत जीवन खिंड मंचर येथे घेऊन गेला व त्या ठिकाणी जाऊन त्याने तिला लाथा बुक्क्यांनी,लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.त्यानंतर तो तिला घरी घेऊन आला व घरी आल्यानंतरही त्यांनी मुस्कान हिला कमरेच्या बेल्टने मारहाण केली त्यानंतर दि.२९ जुलै २०२२ रोजी पहाटे पती सलमान याने पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तिचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून मुस्कान हिने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस हवालदार नाडेकर करत आहेत.