मंचर प्रतिनिधी:
पिंपळगाव खडकी
येथे अटलबिहारी वाचपेयीं विचार मंच व राम जेष्ठ नागरिक संघ यांचे वतीने डॉ मनोहर
डोळे मेडिकल फाउंडेशन भाजप तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या
मार्गदर्शनाखाली आज पिंपळगाव मध्ये मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे
आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच दीपक पोखरकर,रोहिदास पोखरकर राज्यविस्तारक
सचिन बांगर,स्वप्नील बांगर,भाजप पिंपळगाव अध्यक्ष निखिल पोखरकर, जेष्ठ नागरीक संघ भगवान गोसावी ,गणेश बाणखेले, पो पाटील वाघ, विठ्ठलशेठ पोखरकर ,पोपट पोखरकर होते.
शिबिरामध्ये ६० रुग्ण यांची तपासणी करण्यात आली या वेळी १० रुग्ण मोतीबिंदू सापडले असून टप्याटप्याने रुग्ण यांची अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात असल्याचे आरोग्यदूत सुशांत थोरात यांनी सांगितले.या कार्यक्रमास संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले यांनी भेट दिली.कार्यक्रमाचे आभार योगेश बांगर यांनी मानले.