पुणे प्रतिनिधी:
सध्या मोबाईलवर मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर
व्हायरल होत आहे. यात पंजाबी लोक एक व्यक्तीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत
आहेत. अनेकांना वाटलं की हा व्हिडिओ पंजाबमधील आहे. मात्र हा रस्त्यावरील
मारामारीचा व्हिडिओ पुण्यातील असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौकात
रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. पुण्यातील शिवराज चौक
परिसारातील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भर रस्त्यावर मारामारीचा प्रकार
घडल्याने याची चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या मारामारीत मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर काहीजण गंभीर जखमी झाले
आहेत. दरम्यान, जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती
पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणातील मारामारी करणारे हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा धिंगाणा सुरु असताना पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे समोर आलं आहे. येरवडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देखील काम करावं, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.