समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
रानडुक्करांपासून
डाळींब बागेचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून
शेतकऱ्याच्या मुलाचाच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास
बीडसावंगी येथे घडली. अमोल माणिक नरवडे (वय.३० वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्टी
तालुक्यातील बीडसांगवी येथील माणिक नरवडे यांनी शेतात डाळींब बाग लावलेली आहे. या
ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने नरवडे यांनी
बागेला संरक्षण जाळी लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. आज पहाटे साडेपाच
वाजेच्या दरम्यान माणिक नरवडे यांचा मुलगा अमोल हा बागेची पाहणी करण्यासाठी शेतात
गेला. मात्र, विद्युत प्रवाह
बंद न करताच तो बागेत गेला.
दरम्यान, बागेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून अमोल खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बागेचे संरक्षण झाले पण तरुण मुलगा गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.