Skip to main content

खा. संजय राऊत यांना ईडीने अटक का केली..?



मुंबईत गोरेगाव येथे पत्रावाला चाळ आहे. या पत्रावाला चाळच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम 2010 साली हाती घेण्यात आला. श्री राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि संजय राऊत यांचे जवळचे मित्र प्रवीण राऊत यांच्या गुरुअशिष कंन्स्ट्रक्शन कंपनीसोबत पत्रावाला चाळ सोसायटी, म्हाडा आणि गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनी असा तीन पार्टी करार झाला. या करारानुसार पत्रावाला चाळीच्या जागेवरती बांधकाम करायचे होते. त्यातले 3 हजार फ्लॅट महाडाला द्यायचे होते. 672 फ्लॅट हे मूळच्या रहिवाशांना द्यायचे होते. उर्वरीत जागा गूरूअशिष कंपनी विकणार होती.

परंतु ते काम पुर्ण न करताच म्हाडाला चुकीची माहिती देऊन गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांना मिळालेला पत्रावाला चाळचा एफएसआय 9 इतर जणांना विकला. त्यातून गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला 901  कोटी 79 लाख रुपये मिळाले. म्हाडाला फ्लॅट मिळणे अपेक्षित होते, ते मिळाले नाहीत. याउपर गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने एका नव्या प्रकल्पाची त्याच जागेवर घोषणा केली. त्या प्रकल्पातल्या फ्लॅटच्या बुकींग व्दारे 138 कोटी रुपये मिळवले. असा एकूण 1 हजार 39 कोटी 79 लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मुंबई पोलिसांकडे दाखल केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागानं या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर याच्या मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 2018 साली प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली.

या सगळ्या दरम्यान वाधवान बंधूनी प्रवीण राऊतच्या खात्यावरती शंभर कोटी रुपये वळवल्याचे दिसून आले. अशा पद्धतीने पैशांची वेगवेगळ्या खात्यात हेराफेरी झाल्याचं लक्षात आल्यावर ईडीकडे हा तपास वर्ग करण्यात आला. या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या खात्यातून श्री संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावरती 83 लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचे दिसून आले. या 83 लाख रुपयातून वर्षा राऊत यांनी दादर येथे एक फ्लॅट विकत घेतला. याशिवाय स्वप्ना पाटकर, सुजीत पाटकर, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांनी अलिबाग येथे नऊ प्लॉट विकत घेतल्याचे डीडीच्या तपासात उघड झाले. ही चौकशी सुरू असतानाच वर्षा संजय राऊत यांनी 55 लाख रुपये परत खात्यावरती वर्ग केले. माधुरी राऊत यांच्याकडून मिळालेले 83 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

दरम्यान २ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प्रवीण राऊत याला पुन्हा अटक करण्यात आली. सध्या प्रवीण राऊत ईडीच्या कस्टडी आहेत. या संपूर्ण तपासामध्ये काही पैसे एचडीआयएल या खात्यातून प्रवीण राऊत यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आल्याचे उघड झाले आहे. प्रवीण राऊत यांनी आपल्या निकटवर्तीयांच्या खात्यावर यातले कांही पैसे वर्ग केले आहेत.




पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...