जुन्नर प्रतिनिधी:
जुन्नर येथील नवीन एस. टी. बस स्थानकासमोर बाजार समिती लगत
असणाऱ्या दिनेश पान शॉपी नावाच्या टपरीमध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा अवैध
साठा केल्याचे पोलिसांना आढळले.
या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रशांत अनिलसिंग परदेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे २६ हजार रुपये किमतीचा अवैध साठा केलेला प्रतिबंधित गुटखा पानमसाला व तंबाखू असा माल जप्त केला असल्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.