Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

खा. संजय राऊत यांना ईडीने अटक का केली..?

मुंबईत गोरेगाव येथे पत्रावाला चाळ आहे. या पत्रावाला चाळच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम 2010 साली हाती घेण्यात आला. श्री राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि संजय राऊत यांचे जवळचे मित्र प्रवीण राऊत यांच्या गुरुअशिष कंन्स्ट्रक्शन कंपनीसोबत पत्रावाला चाळ सोसायटी, म्हाडा आणि गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनी असा तीन पार्टी करार झाला. या करारानुसार पत्रावाला चाळीच्या जागेवरती बांधकाम करायचे होते. त्यातले 3 हजार फ्लॅट महाडाला द्यायचे होते. 672 फ्लॅट हे मूळच्या रहिवाशांना द्यायचे होते. उर्वरीत जागा गूरूअशिष कंपनी विकणार होती. परंतु ते काम पुर्ण न करताच म्हाडाला चुकीची माहिती देऊन गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांना मिळालेला पत्रावाला चाळचा एफएसआय 9 इतर जणांना विकला. त्यातून गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला 901  कोटी 79 लाख रुपये मिळाले. म्हाडाला फ्लॅट मिळणे अपेक्षित होते, ते मिळाले नाहीत. याउपर गुरुअशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने एका नव्या प्रकल्पाची त्याच जागेवर घोषणा केली. त्या प्रकल्पातल्या फ्लॅटच्या बुकींग व्दारे 138 कोटी रुपये मिळवले. असा एकूण 1 हजार 39 कोटी 79 लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्र...

पिंपळगाव खडकी येथे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन.

मंचर प्रतिनिधी: पिंपळगाव खडकी येथे अटलबिहारी वाचपेयीं विचार मंच व राम जेष्ठ नागरिक संघ यांचे वतीने डॉ मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन भाजप तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पिंपळगाव मध्ये मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच दीपक पोखरकर , रोहिदास पोखरकर   राज्यविस्तारक सचिन बांगर , स्वप्नील बांगर,भाजप पिंपळगाव अध्यक्ष निखिल पोखरकर, जेष्ठ नागरीक संघ भगवान गोसावी  , गणेश बाणखेले, पो पाटील वाघ,   विठ्ठलशेठ पोखरकर ,पोपट पोखरकर होते. शिबिरामध्ये ६० रुग्ण यांची तपासणी करण्यात आली या वेळी १० रुग्ण मोतीबिंदू सापडले असून टप्याटप्याने रुग्ण यांची अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात असल्याचे आरोग्यदूत सुशांत थोरात यांनी सांगितले.या कार्यक्रमास संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले यांनी भेट दिली.कार्यक्रमाचे आभार योगेश बांगर यांनी मानले.

गाय आणि म्हशीचे मांस विक्री करणाऱ्या महिलेला मंचर पोलिसांनी केली अटक .

  मंचर प्रतिनिधी: पेठ, ता.आंबेगाव, जि.पुणे येथे गाय व म्हशीचे मांस ओळखीच्या लोकांना विकणाऱ्या महिलेवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल एस.बी.रावते यांनी दिली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की,पेठ गावच्या हद्दीत श्रीराम मंदिराजवळ एक महीला जनावरांचे मांस विक्री करत असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस.बी.रावते यांना मिळाली.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक महीला मंदिराजवळ बसलेली होती व तिच्याजवळ एक बॅग होती.पोलिसांनी तिला विचारले असता तिने तिचे नाव शफिया इसाक खुरेशी (वय.५० वर्ष) रा जुन्नर जि.पुणे असे सांगितले.सदर महिलेने तिच्या ओळखीच्या लोकांना गाय व म्हशीचे मांस विक्री करण्याचे पोलिसांसमोर कबुल केले.तसेच पोलिसांनी तिच्या जवळील ३ किलो मांस जप्त केले आहे.सदर महिलेवर महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार नाडेकर करत आहेत.

पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या पतीविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  मंचर प्रतिनिधी: चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक कारणावरून पत्नीला वारंवार जबर मारहाण करणाऱ्या पतीवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मुस्कान सलमान सैय्यद (वय.२१ वर्ष)रा.मंचर ता.आंबेगाव हिने फिर्याद दाखल केली आहे.तर सलमान हसन अब्बाज सैय्यद (वय.२७ वर्ष) रा.मंचर,ता.आंबेगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी मुस्कान हिला तिचा पती सलमान वारंवार मारहाण करत असून या अगोदरही फिर्यादीला अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे.दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सलमान यांनी मुस्कान हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन व प्रापंचिक वादावरून तिला शिवीगाळ करत हाताने व कमरेच्या बेल्टने मारहाण केली तसेच आरोपीने बाथरूम साफ करायचे हायड्रोक्लोरिक ऍसिड चे कॅन हातात घेऊन ते फिर्यादीच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीने प्रसंगावधान ठेवत त्यांनी त्यांची पाठ पुढे केली यामुळे   ऍसिड , पाठीवर पडून पाठ लाल झाली आहे. त्यानंतर सलमान पत्नी मुस्कान हिला त्याच्या गाडीत जीवन खिंड मंचर येथे घेऊन गेला व त्या ठिकाणी जाऊन त्याने तिला लाथा बुक्क्या...

कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने शेतकरी मुलाचा मृत्यू.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: रानडुक्करांपासून डाळींब बागेचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून शेतकऱ्याच्या मुलाचाच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बीडसावंगी येथे घडली. अमोल माणिक नरवडे (वय.३० वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील माणिक नरवडे यांनी शेतात डाळींब बाग लावलेली आहे. या ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने नरवडे यांनी बागेला संरक्षण जाळी लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. आज पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान माणिक नरवडे यांचा मुलगा अमोल हा बागेची पाहणी करण्यासाठी शेतात गेला. मात्र , विद्युत प्रवाह बंद न करताच तो बागेत गेला. दरम्यान , बागेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून अमोल खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बागेचे संरक्षण झाले पण तरुण मुलगा गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘हयात’ च्या खात्रीसाठी अर्धांगवायू ग्रस्ताला २ तास ताटकळत ठेवलं, प्रशासनाचा कारभार.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: प्रशासनातील अधिकारी किती निगरगट्ट झालेत , याचा प्रत्यय बीडच्या तहसील कार्यालयामध्ये काल सायंकाळी पहावयास मिळाला. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी हयात आहे की नाही ? हे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी एका अर्धांगवायूने त्रस्त झालेल्या लाभार्थ्याला कार्यालयात बोलून घेतले. सदर व्यक्ती तोच आहे का याची शहानिशा करण्यासाठी तब्बल दोन तास दारातच ठेवून घेतले. निगरगट्ट अधिकाऱ्याने दाखविलेल्या अमानवीय वागणुकीबद्दल सामाजिक स्थरातून संताप व्यक्त होतोय.   संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थ्याला महिन्याला एक हजार रुपयांचं मानधन मिळतं. मात्र ते मानधन मिळवण्यासाठी किती यातना सोसाव्या लागल्या , हे या व्यक्तीच्या व्हिडिओतून दिसतंय. हा व्हिडिओ सध्या बीडमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आसाराम आठवले हे तीन वर्षांपासून अर्धांगवायूचे रुग्ण आहेत. त्यांना संजय गांधी निराधार योजनेतून शासनाचे महिन्याकाठी एक हजाराचे मानधन मिळते. मात्र मागील वर्षभरापासून त्यांना हे मानधन मिळालेलं नाही. बीड तालुक्यातील पाटेगाव येथे आठवले पत्नी , मुलगा आणि सुनेबरोबर वास्तव्यास आहेत. कुटुंबाने त्यां...

लांडेवाडी येथील भैरवनाथ मंदिरात अज्ञात चोरट्यांनी केली चोरी.

घोडेगाव प्रतिनिधी: लांडेवाडी नारोडी फाटा येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिरात चोरट्यांनी चोरी केली असून भैरवनाथ मंदिरातील दान पेटीतील ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे.याबद्दल भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष बाबाजी हरिभाऊ हुले रा.लांडेवाडी,नारोडी फाटा यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सविस्तर माहिती अशी की,दिनांक २८ जुलै २०२२ रात्री १०.३० ते २९ जुलै २०२२ रोजी सकाळी ५.४६ वाजताच्या दरम्यान मौजे लांडेवाडी येथील पिंगळवाडी गावच्या हद्दीत असलेल्या भैरवनाथ महाराज मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.सदर चोरांनी मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या खिडकीचे स्टीलचे गज आणि काच फोडून मंदिरात प्रवेश केला.मंदिरातील दानपेटी मधील अंदाजे ५०,०००/-रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केली असून सदर अज्ञात चोरट्यांविरुद्ध भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष बाबाजी हरिभाऊ हुले यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलीस करत आहेत.

जुन्नरला गुटखा, तंबाखूचा साठा जप्त.

जुन्नर प्रतिनिधी: जुन्नर येथील नवीन एस. टी. बस स्थानकासमोर बाजार समिती लगत असणाऱ्या दिनेश पान शॉपी नावाच्या टपरीमध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा अवैध साठा केल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रशांत अनिलसिंग परदेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे २६ हजार रुपये किमतीचा अवैध साठा केलेला प्रतिबंधित गुटखा पानमसाला व तंबाखू असा माल जप्त केला असल्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत चूक.

पुणे प्रतिनिधी: पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी दि.२८ काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत चूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .बारामती तालुक्यातील २ गटांमध्ये याआधी  अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठीचे आरक्षण असतानासुद्धा हे २ गट खुले दाखविण्यात आले.परिणामी या २ गटात पुन्हा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे .या चुकीमुळे गुरुवारी काढण्यात आलेली आरक्षण सोडत पुन्हा काढावी लागणार आहे .यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  फेरसोडतीला परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत .या वृत्ताला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान जिल्ह्यातील गटांची नव्याने सोडत काढली तरीही सुमारे पाच-सहा गटांचा अपवाद वगळता अन्य गटांचे आरक्षण फेरसोडतीतही कायम राहील,असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .शिवाय हे २ गट खुला संवर्ग किंवा नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) असणार आहे .परिणामी सध्या ओबीसी आणि खुल्या गटासाठी जाहीर झालेल्या गटांतील एक किंवा दोन गटांचे आरक्षण बदलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . राज्य निवडणूक आयोगाच्या न...

वृक्षतोड प्रकरणी अज्ञात २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

पुणे प्रतिनिधी: मुंबई द्रुतगती मार्गालगतच उर्से गावच्या हद्दीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याप्रकरणी अज्ञात २५ जणांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर गणपत जाधव (वय.६० वर्षे) रा. कर्वे रस्ता , पुणे यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से गावाच्या हद्दीत द्रुतगती मार्गाला खेटून असलेल्या जमिनीवरील मोठी झाडे कापून नेण्यात आली आहेत. ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींमुळे हा प्रकार उघड झाला. तथापि , शासकीय यंत्रणेला याबाबत काहीच माहिती नव्हती. २५ ते २८ जुलैदरम्यान हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्यापक महिलेचा मृत्यू ; डंपरचालक पसार.

पुणे प्रतिनिधी: भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्याापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्ता भागात घडली. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. वृषाली तुषार थिटे (वय ३८ वर्ष) रा. सुदत्त संकुल , शिंदे मैदानाजवळ , वडगाव बुद्रुक असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून त्याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डंपरचालक घटनास्थळी डंपर सोडून पसार झाला असून पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे , अशी माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिली , थिटे नऱ्हे परिसरातील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.सकाळी नऊच्या सुमारास त्या दुचाकीवरुन महाविद्यालयात जात होत्या. वडगाव बुद्रुक परिसरातील शिंदे मैदानाजवळील रस्त्यावर भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या प्रा. थिटे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

मद्यधुंद चालकाने १३ वर्षीय शाळकरी मुलीला चिरडले; संतप्त जमावाने दिला ट्रक पेटवून.

पुणे प्रतिनिधी : मद्यधुंद चालकाने १३ वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना काटी-वडापुरी रोडवरती छोट्या कॅनल नजिक   २९ जुलैच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर   संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. मुलीला चिडल्यानंतर मद्यधुंद चालकास जमावाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तुप्ती नाना कदम (वय.१३ वर्ष) या विद्यार्थीनीचा   या अपघातात जागीच   मृत्यू   झाला आहे. तर गणेश नाना कदम वय १० वर्षीय विद्यार्थ्याला   डोक्यात जबर मार लागल्याने इंदापुर येथील कदम बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे हे विद्यार्थी    शिक्षण घेत होते. इयत्ता सातवी व पाचवीमध्ये शिक्षण घेत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे चुलते   दुचाकीवरून शाळेत सोडवण्यासाठी जात असताना काटी वडापुरी रोडवरती खडीचा ओव्हरलोड टिपर घेऊन मद्यधुंद चालकाने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये   तुप्ती व गणेश रस...

जमिनीच्या वादावरून भररस्त्यात दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी.

पुणे प्रतिनिधी: सध्या मोबाईलवर मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पंजाबी लोक एक व्यक्तीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत आहेत. अनेकांना वाटलं की हा व्हिडिओ पंजाबमधील आहे. मात्र हा रस्त्यावरील मारामारीचा व्हिडिओ   पुण्यातील   असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौकात रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. पुण्यातील शिवराज चौक परिसारातील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भर रस्त्यावर मारामारीचा प्रकार घडल्याने याची चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी येरवडा   पोलिस   ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारामारीत मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान , जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील मारामारी करणारे हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा धिंगाणा सुरु असताना पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे समोर आलं आहे. येरवडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था...

जखमी पोलिसांकडून आरोपींची धरपकड; पुलावरुन पडून कारचा चक्काचूर, तरीही 'ड्युटी फर्स्ट'.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: गुरे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी सिल्लोडकडे जात असताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे वाहन पूलावरुन खाली कोसळून अपघात झाल्याची घटना घडली होती. विशेष बाब म्हणजे , अपघातानंतरही पोलीस थांबले नाहीत , ' ड्युटी फर्स्ट ' असे म्हणत जखमी अवस्थेत पोलीस सिल्लोडला पोहचले व गुरे चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. अपघात एवढा भीषण होता ती यात वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते. मात्र , यातही सुदैवाने वाहनातील तीनही कर्मचारी बचावले. कर्मचाऱ्यांना मुक्कामार लागला असून दुखापत झाली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुरे चोरीच्या गुन्ह्यातील संशयित हे सिल्लोड येथील असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार त्‍यांनी पोलीस नाईक नितीन आमोदकर , पोलीस नाईक गोवर्धन बोरसे , पोलीस नाईक संदीप पाटील या कर्मचाऱ्यांना रवाना केले. कर्मचारी खाजगी वाहनाने सिल्लोड येथे जात असताना गाडी पूलावरुन कोसळून वाहनाचा अपघात झाला. यात वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला. त्यात सुदैवाने ते वाचले परंतु वाहनातील कर्मचाऱ्य...

रक्कम दुप्पट करण्याच्या आमिषाने ३० ते ३५ महिलांची फसवणूक.

पुणे प्रतिनिधी: पंधरा दिवसात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने ३० ते ३५ महिलांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने त्यांना एक लाख रुपये दिले होते – आरती ठाकूर उर्फ कृष्णाबेन , नाजमा सय्यद , सुमेरा सय्यद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लष्कर भागात राहायला आहेत. त्यांची आरोपी ठाकूर , सय्यद यांच्याशी ओळख झाली होती. आरोपी महिलांनी त्यांना पंधरा दिवसात रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदार महिलेने त्यांना एक लाख रुपये दिले होते. गुंतवणूक केलेली रक्कम आरोपी महिलांनी दुप्पट करुन दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत आरोपी महिलांनी अशाच पद्धतीने ३० ते ३५ महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

फेसबुक ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं; नागरिकांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: सोशल मीडियावरून   झालेले वाद , तंटे याच्या बातम्या आपण एरवी ऐकतच असतो. मात्र फेसबुकवरील ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं आहे. प्रकरण आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील. मळेगाव विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले गाव आहे. राज्यभरात जलयुक्त शिवार अभियानमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याने मळेगावची सर्वत्र ओळख आहे. याशिवाय तंटा मुक्त अभियानामध्ये विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जवळपास ३६०० लोकसंख्या असलेल्या या गावात बहुतांश लोक हे उच्चशिक्षित असल्याने केवळ बार्शीतच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मळेगावची वेगळी ओळख आहे. मात्र याच गावातील महिलांची बदनामी फेसबुकवरील एका ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. ' मळेगाव पोलखोल ' असे या फेसबुकवरील ग्रुपचे नाव असून यामध्ये मळेगाव येथील महिलांविषयक आक्षेपार्ह आणि बदनामी करणारे पोस्ट शेअर केल्या जात आहेत. गावच्या महिला सरपंचांविरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहे. या विरोधात कारवाईची मागणी करण्यासाठी मळेगावातील सुमारे ५० ते ६० नागरिकांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.  ...

अवसरी गावच्या विकासकामांसाठी भरगोस निधी द्यावा - चंद्रशेखर बावनकुळे

मंचर प्रतिनिधी: अवसरी खुर्द(ता.आंबेगाव) या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे युवा मोर्चा शाखा उद्घाटन आमदार तथा युवा मोर्चा प्रभारी  चंद्रशेखर बावनकुळे साहेब व संघटन मंत्री सुनील कर्जतकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे , आंबेगाव तालुका भाजपा संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले , भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुशांत थोरात , आंबेगाव तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मेघश्याम भोर , शहरप्रमुख स्वप्नील इंदोरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे स्वागत केले. यावेळी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष मेघश्याम  भोर यांनी अवसरी खुर्द गावाच्या विकासासाठी भरघोस निधी द्यावा अशी मागणी बावनकुळे साहेब यांच्याकडे केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अवसरी खुर्द गावच्या विकासासाठी भरघोस निधी देणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी...

नीरावागज येथे वीज पडून एकजण गंभीर जखमी.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: बारामती तालुक्यात नीरावागज गावात बुधवार (ता. २७) रोजी रात्रीच्यावेळी मुसळधार पावसात वीज कोसळली. या घटनेत एक मजूर गंभीर जखमी झाला. साहेबराव नारायण पवार (वय ६० वर्ष) रा.ऊरळी कांचन पुणे , हे जखमी मजूराचे नाव आहे. पवार यांना वीजेचा मोठ्या धक्का भसल्याने त्यांच्या मानेपासूनचा शरिराच्या डाव्या बाजूचा भाग भाजला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमीला वैद्यकिय उपचार होण्यासाठी रुग्णवाहिकेद्वारे बारामतीच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु संबंधित रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून हाॅस्पीलटला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान , नीरावागज येथे वीजेच्या धक्क्याने जखमी झालेले पवार हे कुटुंबियांसह घिसाडी काम करण्यासाठी ऊरळी कांचन येथून आले होते. सरकारची मदत मिळणार नीरावागज येथे पावसात वीज पडून घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. जखमी साहेबराव पवार यांना ससून येथे उपचार सुरू आहेत. नैसर्गिक आपत्ती हेडखाली राज्य शासन संबंधित जखमीच्या कुटुंबियांना मदत करू शकते. ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार , शरद लेंडे , विवेक वळसे पाटील , माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे , प्रवीण माने , माजी कृषी सभापती सुजाता पवार , बाबुराव वायकर , मावळत्या सभागृहातील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर आदींचे पत्ते आरक्षण सोडतीमध्ये कट झाले आहेत. याउलट माजी अध्यक्ष देवराम लांडे , निर्मला पानसरे , माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे , माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील , माजी महिला बालकल्याण सभापती सुनीता गावडे , वैशाली पाटील , पूजा पारगे , मावळत्या सभागृहातील काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे , माजी ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत बाठे , वीरधवल जगदाळे आदींना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. २८) काढण्यात आली. या सोडतीमुळे कोणाचा पत्ता कट आणि कोणाला पुन्हा संधी मिळणार , याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद निवडणूक शाखेचे समन्वयक व उपजिल्ह...