पुणे प्रतिनिधी :
चंदननगर भागातील एका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक
सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला असून जुगार अड्ड्याचा मालक, कामगार तसेच जुगार खेळणारे अशा ४०
जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खराडी जकातनाक्यापासून काही अंतरावर
असलेल्या एका हॅाटेलच्या मागे पत्र्याच्या खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती
सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्या वेळी
जुगार अड्ड्यावरील कामगार जुगार तसेच जुगार खेळणारे तेथे जमले होते. पोलिसांनी
विश्वनाथ तिवार, विजय संकपाळ, सूरज अभंग, शरीफ शेख, दत्ता गायकवाड, संदीप चौधरी यांना केली. या प्रकरणी जुगार अड्ड्याचा मालक
व्हिक्टर उर्फ विकी डॅनियल ॲन्थोनी, लॉरेन्स उर्फ रॉकी यांच्या विरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, राजश्री मोहिते, नीलम शिंदे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे आदींनी
ही कारवाई केली.