पुणे प्रतिनिधी :
अमली पदार्थ विक्रीस आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ
विरोधी पथकाने लोणी काळभोर परिसरात पकडले. त्यांच्याकडून २० किलो गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा चार
लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुमार अनिल नितळे (वय ३० वर्षे)रा. गायकवाडनगर, लोणी रेल्वे स्थानक परिसर ऋषीकेश रमेश बेले (वय २४ वर्षे)रा. इंदिरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दुचाकीस्वार नितळे आणि साथीदार बेले पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्ती परिसरात आले होते. त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २० किलो गांजा, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, योगेश मोहिते आदींनी ही कारवाई केली.