पुणे प्रतिनिधी:
कोरेगाव पार्क परिसरातील लोणकर वस्तीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. हर्षद बिश्वास (वय २४.वर्षे) रा. कोलकाता असे मृत्यमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लोणकर वस्तीत एका इमारतीचे बांधकाम सुरु
होते. हर्षद हा सातव्या मजल्यावरुन खाली पडला. पाचव्या मजल्यावर जाळी लावली होती.
त्यात त्याचे हेल्मेट पडले. पाठोपाठ तो जाळीवर पडल्याने जाळी तुटून तो खाली पडला.
जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू
झाला. मुंढवा पोलीस तपास करत आहेत.