परशुराम पुरोहित संघाच्या वतीने नारायणगाव येथील जिल्हा परिषद शाळा नं २ मुलींची यांना छत्र्यांचे वाटप.
प्रतिनिधी:जितेंद्र पुराणिक
परशुराम
पुरोहित संघ जुन्नर तालुका यांच्या वतीने नारायणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा मुलींची नं.२ यांना छत्र्यांचे वाटप केले.
परशुराम पुरोहित संघ जुन्नर तालुक्यातील पुरोहितांच्या वतीने सामाजिक जाणिवेच्या दृष्टीकोनातुन नारायणगाव येथील जिल्हा परिषद शाळा नं २ मुलींची येथील १४० मुलींना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.पावसाळ्याच्या दिवसात छत्रीची अत्यंत गरज वाटते.हीच गरज ओळखून संघाने हा कार्यक्रम राबविला.तसेच संघाच्या वतीने शाळेस १००० रूपयांची देणगीही देण्यात आली.
यावेळी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुलकर्णी,उपाध्यक्ष नवनीत गाजरे,सचिव विजय देशपांडे, संघाचे संस्थापक शाम जोशी,वल्लभ कुलकर्णी
व संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी संघ वेळोवेळी सामाजिक उपक्रम
राबवित असल्याबद्दल सर्व माहिती सविस्तर दिली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका
कोल्हे मॅडम यांनीही संघ राबवित असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.प्रास्ताविक
जितेंद्र पुराणिक यांनी केले.तर आभार सूर्यकांत वैद्य यांनी आभार मानले.