पुणे प्रतिनिधी:
खडकीतील दारुगोळा कारखान्याची सुरक्षा व्यवस्था
भेदून आवारातील १३ चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत खडकी दारुगोळा कारखान्यातील अधिकारी मोहन मोरे (वय ५८ वर्षे) रा. नारायण पेठ यांनी
खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकी दारूगोळा कारखान्याचे आवार विस्तीर्ण
आहे. मध्यरात्री चोरटे दाट झाडीतून दारुगोळा कारखान्यात शिरले. चोरट्यांनी बोट
क्लब परिसरातील १३ चंदनाची झाडे कापून नेली. दारुगोळा कारखान्याच्या मागील बाजूस
मुळा नदी आहे. नदीपात्रातून चोरटे आवारात शिरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली
आहे. पोलीस कर्मचारी एम. एम. शेख तपास करत आहेत.