पुणे प्रतिनिधी:
व्यवसायासाठी घेतलेले १० लाख रुपयांचे कर्ज व्याजासह फेडल्यानंतरही आणखी व्याजाची मागणी करून समाजातील विधवा मुलीशी मुलाचे लग्न लाव,नाहीतर मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
अनिल जयभगवान
बन्सल (वय.५३ वर्षे) रा.हरीगंगा सोसायटी,मार्केट यार्ड असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.अनिल बन्सल
याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कोथरूड मधील ५४ वर्षाच्या
व्यावसायिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.हा प्रकार २४
जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी
दिलेली माहितीनुसार,अनिल बन्सल
यांचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे.फिर्यादी यांनी बन्सल याच्या जयभगवान शिवकुमार
अग्रवाल या मार्केट यार्ड येथील ऑफिसवर गेले होते.त्यांनी मुलाच्या व्यवसायासाठी
पेपर कप मशीन खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये दरमहा २२ हजार रुपये व्याजाने घेतले
होते त्यापोटी बन्सल यांनी फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या कोथरूड येथील फ्लॅटची
मूळ कागदपत्रे व कोरा चेक घेऊन करारनामा केला होता.फिर्यादी यांनी मुद्दल व व्याज
असे एकूण १२ लाख ९३ हजार रुपये परत केले.तरीही त्यांची कागदपत्रे व चेक परत केला
नाही.फिर्यादी यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने आणखी व्याजाची रक्कम मागितली.त्यासाठी
फिर्यादी यांनी वेळ मागितल्याने आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या समाजातील विधवा
मुलीशी फिर्यादी यांचे मुलाचे लग्न लावून दे,असे सांगितले.नाहीतर फ्लॅटची कागदपत्रे देणार नाही असे बोलले.फिर्यादी
यांनी विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली
आहे.फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला असता त्यांना शिवीगाळ करून
मारहाण करण्याची धमकी दिली आहे.फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला
होता.त्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर
बन्सल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.सहाय्यक पोलीस
निरीक्षक बाबर तपास करत आहेत.