Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

पोलिसांची कारवाई ;२१ किलो गांजा केला जप्त.

 मुंबई प्रतिनिधी : भिवंडी येथील कामतघर भागात ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २१ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी हसन शेख (वय.२१ वर्षे) याला अटक केली असून त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामतघर येथील हनुमाननगर भागात एकजण घरामध्ये गांजा साठवून ठेवत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना त्याच्या घरामध्ये २१.३१० किलो वजनाचा एकूण ३ लाख १५ हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हसन याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू.

पुणे प्रतिनिधी: कोरेगाव पार्क परिसरातील लोणकर वस्तीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. हर्षद बिश्वास (वय २४ .वर्षे) रा. कोलकाता असे मृत्यमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की , लोणकर वस्तीत एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. हर्षद हा सातव्या मजल्यावरुन खाली पडला. पाचव्या मजल्यावर जाळी लावली होती. त्यात त्याचे हेल्मेट पडले. पाठोपाठ तो जाळीवर पडल्याने जाळी तुटून तो खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. मुंढवा पोलीस तपास करत आहेत.  

परशुराम पुरोहित संघाच्या वतीने नारायणगाव येथील जिल्हा परिषद शाळा नं २ मुलींची यांना छत्र्यांचे वाटप.

प्रतिनिधी:जितेंद्र पुराणिक  परशुराम पुरोहित संघ जुन्नर तालुका यांच्या वतीने नारायणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची नं.२ यांना छत्र्यांचे वाटप केले. परशुराम पुरोहित संघ जुन्नर तालुक्यातील पुरोहितांच्या वतीने सामाजिक जाणिवेच्या दृष्टीकोनातुन नारायणगाव येथील जिल्हा परिषद शाळा नं २ मुलींची येथील १४० मुलींना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.पावसाळ्याच्या दिवसात छत्रीची अत्यंत गरज वाटते.हीच गरज ओळखून संघाने हा कार्यक्रम राबविला.तसेच संघाच्या वतीने शाळेस १००० रूपयांची देणगीही देण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुलकर्णी , उपाध्यक्ष नवनीत गाजरे , सचिव विजय देशपांडे , संघाचे संस्थापक शाम जोशी , वल्लभ कुलकर्णी  व संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी संघ वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल सर्व माहिती सविस्तर दिली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कोल्हे मॅडम यांनीही संघ राबवित असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.प्रास्ताविक जितेंद्र पुराणिक यांनी केले.तर आभार सूर्यकांत वैद्य यांनी आभार मानले.

नामांकित कंपनीची बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करणार्‍या ६ जणांना अटक.

पुणे प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील गोडाऊनमध्ये नामांकित कंपनीची बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या सहा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटना स्थळावरून पोलिसांनी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.तर या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशिकांत खेत्रमोहन पात्रा,मानस बाबुली पात्रा,गौतम निरंजन मिडधा,नारायण लालजी मेरा,लीनेश हिराचंद गाला आणि प्रवित्र जगबंधू पात्रा या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लोणी काळभोर येथील येथील एका गोडाऊनमध्ये नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधन तयार केली जात आहेत. याबाबतची माहिती पोलिस हवालदार राजेश दराडे यांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाव घेऊन , तेथील नारायण लालजी मेरा यांच्याकडे संबधित सौंदर्य प्रसाधना बाबत परवाना आहे का ? अशी विचारणा केल्यावर नाही असे उत्तर दिले.त्यावेळी तेथील गोडाऊनमध्ये अनेक नामांकित कंपनीचे बनावट प्रॉडक्ट आढळून आले.त्या ठिकाणी ३७ लाखाहून अधिकचा मुद्दे माल जप्त करण्यात...

धक्कादायक !प्रेमप्रकरणातून ३ महिलांची हत्या करत एकाची आत्महत्या.

मुंबई प्रतिनिधी: मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.एका ड्रायव्हरने प्रेमप्रकरणातून डॉक्टरची पत्नी आणि त्याच्या दोन मुलीची हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.कांदिवली पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.सर्व मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले असून,घटनास्थळी सुसाईड नोटही सापडल्या आहेत,असे पोलीस सांगण्यात आले आहे. किरण दळवी,मुस्कान दळवी,भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नाव आहेत.दरम्यान,भूमी दळवी नामक महिलेच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख ड्रायव्हर शिवदयाल याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार कांदिवली देना बँक जंक्शन येथे एक माणूस हातात विळा घेऊन फिरत आहे अशी माहिती कांदिवली पोलिसांना नियंत्रण कशावर मिळाली.त्यानुसार मोबाईल  वाहनासह  रात्र पाळीवर असलेल्या पोलीस निरीक्षक पीआय वारे घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी परिसराची झडती घेतली.लोकांशी विचार...

विधवा मुलीशी मुलाचे लग्न करण्याची जबरदस्ती;धमकाविणाऱ्या सावकाराला अटक .

पुणे प्रतिनिधी: व्यवसायासाठी घेतलेले १० लाख रुपयांचे कर्ज व्याजासह फेडल्यानंतरही आणखी व्याजाची मागणी करून समाजातील विधवा मुलीशी मुलाचे लग्न लाव , नाहीतर मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अनिल जयभगवान बन्सल (वय.५३ वर्षे) रा.हरीगंगा सोसायटी , मार्केट यार्ड असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.अनिल बन्सल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कोथरूड मधील ५४ वर्षाच्या व्यावसायिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.हा प्रकार २४ जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार , अनिल बन्सल यांचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे.फिर्यादी यांनी बन्सल याच्या जयभगवान शिवकुमार अग्रवाल या मार्केट यार्ड येथील ऑफिसवर गेले होते.त्यांनी मुलाच्या व्यवसायासाठी पेपर कप मशीन खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये दरमहा २२ हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यापोटी बन्सल यांनी फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या कोथरूड येथील फ्लॅटची मूळ कागदपत्रे व कोरा चेक घेऊन करारनामा केला होता.फिर्यादी यांनी मुद्दल व व्याज असे एकूण १२ लाख ९३ ...

जुगार अड्ड्यावर छापा ;साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुणे प्रतिनिधी :   चंदननगर भागातील एका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जुगार अड्ड्याचा मालक , कामगार तसेच जुगार खेळणारे अशा ४० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खराडी जकातनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या एका हॅाटेलच्या मागे पत्र्याच्या खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्या वेळी जुगार अड्ड्यावरील कामगार जुगार तसेच जुगार खेळणारे तेथे जमले होते. पोलिसांनी विश्वनाथ तिवार , विजय संकपाळ , सूरज अभंग , शरीफ शेख , दत्ता गायकवाड , संदीप चौधरी यांना केली.   या प्रकरणी जुगार अड्ड्याचा मालक व्हिक्टर उर्फ विकी डॅनियल ॲन्थोनी , लॉरेन्स उर्फ रॉकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक , राजश्री मोहिते , नीलम शिंदे , इरफान पठाण , हनुमंत कांबळे आदींनी ही कारवाई केली.

कामावरुन काढून टाकल्याने दोघांनी दुकानाला लावली आग; ५० लाखांचे फर्निचर भस्मसात .

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: कामावरुन काढून टाकल्याने दोघांनी दुकानात आग लावल्याची घटना उरळी कांचन परिसरात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ओंकार गायकवाड , अनिकेत मोटे दोघे रा. उरळी कांचन , सोलापूर रस्ता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत स्वप्नील भगवान कांचन (वय ३६ वर्षे)   रा. उरळी कांचन यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांचन यांच्या दुकानात आरोपी गायकवाड आणि मोटे कामाला होते. दोघांना काही दिवसांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर कांचन यांच्या दुकानात आग लागली. आगीत दुकानातील ५० लाखांच्या फर्निचरचे नुकसान झाले. आरोपी गायकवाड , मोटे यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. दोघांनी दुकानात आग लावल्याचा संशय कांचन यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानंतर या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.

सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा खून; पाच जणांना अटक.

पुणे प्रतिनिधी: हॉटेल पार्किंग मधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चौघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.   नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३ वर्षे ) रा. आंबेगाव बु. असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.   युवराज जंबु कांबळे , ओंकार अशोक रिठे , वैभव पोपट अदाटे , मनोज दत्तात्रय सूर्यवंशी , विष्णु कचरु कदम रा. नर्‍हे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.   याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आशिष रमेश कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना   साई विश्व सोसायटी , न्यू प्यारा बार समोरील पार्किंगच्या जागेत घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी संगनमत करुन पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन नरेंद्र खैरे यांना बेदम मारहाण केली.   त्यानंतर तिघा जणांनी त्याला उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. चारही आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या खिशातील पाकीट , मोबाईल , हेडफोन इत्यादी वस्तू चोरुन नेल्या. मंगळवारी सकाळी ...

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन; पालिकेकडून ११ कोटी रूपये खर्चास मान्यता.

पुणे प्रतिनिधी: पिंपरी महापालिका तसेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी यांच्या मान्यतेने आणि हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे ६ देशांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा होणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या या स्पर्धांसाठी ११ कोटी रुपये खर्चास प्रशासक आणि आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. पिंपरी चिंचवड शहराला “ स्पोर्टस् हब ” म्हणून विकसित करण्याचा निर्धार:- उद्योगनगरी , कामगारनगरी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले शहर असा नावलौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला “ स्पोर्टस् हब ” म्हणून विकसित करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यादृष्टीने शहरात विविध खेळांच्या स्पर्धांचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन केले जात आहे. हॉकी इंडिया , हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शहरामध्ये राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरूनगरच्या पॉलिग्रास मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धांचे नियोजन महापालिकेने यशस्वीरित्या पार पाडले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ह...

पत्नीला नाहक त्रास देत असल्याच्या कारणावरून नातवाने केला आजीचा खून.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: आंतरजातीय विवाह केल्यावरून आजी रजिया शेख ही सातत्याने माझ्या पत्नीला नाहक त्रास देत होती. तिचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगत विनाकारण ती पत्नीची बदनामी करीत होती , या रागातून रजिया शेख यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची बाब उघड झाली आहे. शाहनवाज महेबूब शेख असे आजीचा खून करणाऱ्या त्या तरूणाचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या रजिया शेख या शनिवारपासून दिनांक २५ पासून बेपत्ता होत्या. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून त्यांचा खून झाल्याची खात्री पोलिसांना झाली होती. ७२ वर्षीय महिलेचा खून कोणी का करेल , यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तिच्या नात्यातील लोकांकडे विचारपूस केली. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी शाहनवाज व त्याची आजी रजिया यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता , अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि त्याच्या ओळखीतील व्यक्तीमार्फत त्याला बोलावून घेतले. संशयित म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आजीचा खून केल्याची कबुली दिली. सध्या शाहनवाज हा पोलिस ...

चंदनाची चोरी ; १३ झाडे कापून चोरटे पसार.

पुणे प्रतिनिधी :   खडकीतील दारुगोळा कारखान्याची सुरक्षा व्यवस्था भेदून आवारातील १३ चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत खडकी दारुगोळा कारखान्यातील अधिकारी मोहन मोरे (वय ५८ वर्षे ) रा. नारायण पेठ यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकी दारूगोळा कारखान्याचे आवार विस्तीर्ण आहे. मध्यरात्री चोरटे दाट झाडीतून दारुगोळा कारखान्यात शिरले. चोरट्यांनी बोट क्लब परिसरातील १३ चंदनाची झाडे कापून नेली. दारुगोळा कारखान्याच्या मागील बाजूस मुळा नदी आहे. नदीपात्रातून चोरटे आवारात शिरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस कर्मचारी एम. एम. शेख तपास करत आहेत.

खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा घातला गंडा.

पुणे प्रतिनिधी: व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला.याबाबत आकाश दीप संधू (वय ४७ .वर्ष) रा. महंमदवाडी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुीसार अनोळखी मोबाईलधारक तसेच बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश खासगी विमान कंपनीत वैमानिक आहेत. त्यांना व्यवसायात गुंतवणूक करायची होती. संकेतस्थळावर त्यांनी गुंतवणूक योजनांविषयी माहिती घेतली होती. तेथे त्यांना टोन इमिको क्लब या कंपनीच्या योजनेविषयी माहिती मिळाली. रेडवाईन तयार करण्यासाठी लागणारी सामग्री तयार करण्यात येत असल्याची बतावणी चोरट्यांकडून त्यांच्याकडे करण्यात आली होती. या व्यवसायाची साखळी संपूर्ण देशभरात पसरली असून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल , असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. गुंतवणूक योजनेबाबतची बनावट कागदपत्रे चोरट्यांनी त्यांना पाठविली. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात १६ लाख ६२ हजार रुपये जमा केले. संधू यांना कोणताही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्य...

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथीदारांना न्यायालयीन कोठडी

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित तसेच ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. आरोपी संतोष सुनील जाधव (वय २८, रा. मंचर) याच्यासह साथीदार सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय १९, रा. नारायणगाव), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, रा. गुजरात), तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव) यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून गेल्या एक वर्षी आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावात ओंकार बाणखेले याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. बाणखेले खून प्रकरणात मुख्य आरोपी संतोष जाधव याच्यासह चौदा आरोपींच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. जाधव, महाकाळ, सूर्यवंशी, शिंदे यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता आहे. बाणखेले खून प्रकरणातील प्रत्यक...

भीषण अपघात; ३ वर्षाच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू.

पुणे प्रतिनिधी: जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका मोटारसायकलला मागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मोटारसायकल वरील तीन वर्षांच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू झाला असून , वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला आहे. पुष्पा पवन शर्मा (वय.२६ वर्ष) , युवराज पवन शर्मा (वय.३ वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे असून , पवन गणपतीलाल शर्मा (वय.२७ वर्ष) तिघेही सध्या रा.निगडी , मूळ रा. राज्यस्थान असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पवन शर्मा हे त्यांच्या मोटारसायकलने त्यांची पत्नी पुष्पा व त्यांचा तीन वर्षाचा लहान मुलगा युवराज हे तिघे लोणावळ्यात फिरायला आले होते. लोणावळ्यात फिरून झाल्यानंतर ते पुन्हा निगडीला घरी चालले होते. कार्ला फाट्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीत त्यांच्या मोटारसायकलला मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. या भीषण धडकेत मोटारसायकलवरील तीन वर्षांच्या बाल...

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसेनेला पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फटका - आढळराव पाटील

पिंपरी प्रतिनिधी:  महाविकास आघाडीच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. सरकारला विरोध नाही. मात्र, गावागावांत शिवसैनिकांवर अन्याय होतो आहे. प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगता येत नाही, अशी व्यथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेच आढळराव यांचा रोख होता. तथापि, त्यांनी पवारांचा थेट नामोल्लेख केला नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत चाकणला झाला. यावेळी बोलताना आढळराव यांनी सध्याच्या शिवसेनेतील घडामोडींवर भाष्य करतानाच पक्षनेतृत्वाकडून स्थानिक पातळीवर वेळोवेळी होत आलेले दुर्लक्ष आणि त्याचा गैरफायदा घेऊन राष्ट्रवादीने शिवसेनेच्या विरोधात चालवलेले कुरघोडीचे राजकारण, याचा सविस्तर पाढाच संपर्कप्रमुखांसमोर वाचला. आढळराव म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेला पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला ...

खोदकाम आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहनचालकाचा मृत्यू.

नाशिक प्रतिनिधी: पहिल्याच पावसात रस्त्यांची झालेली दुरवस्था अपघाताचे कारण ठरू लागली असून वर्दळीच्या अशोका मार्ग परिसरातील रस्त्यावरील खड्डय़ामुळे ४० वर्षांच्या दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले. एका खासगी रुग्णालयासमोर हा अपघात झाला. रस्त्यांवरील खड्डे आणि ठिकठिकाणी चाललेली खोदकामे पावसाळय़ात वाहनधारकांची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत. पावसामुळे दरवर्षी शहरातील रस्त्यांची दुरवस्था होते. यंदा पावसाने केवळ एक , दोन वेळा हजेरी लावली आहे. त्यात खड्डय़ामुळे हा अपघात झाला. भावेश कोठारी (वय ४० वर्षे) राज अपार्टमेंट , बिग बाजार शेजारी , नाशिकरोड असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कोठारी हे गुरुवारी अशोका मार्गाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर निघाले होते. एका रुग्णालयासमोर दुचाकी खड्डय़ात आदळल्याने कोठारी हे रस्त्यावर पडले. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागला. बेशुध्दावस्थेत त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान , रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे याआधीही अनेक अपघात झाले आहेत. त्यात विविध भा...

बांधकाम व्यावसायिकाला भोंदूबाबाने ठगवले तब्बल ५६ लाखाला.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: एका बांधकाम व्यावसायिकाला ५० कोटीचा पाऊस पाडून देतो असे आमिष दाखवत ५ जणांच्या टोळक्याने त्याची ५६ लाखाची फसवणूक केल्याची घटना शनिवारी सकाळी ठाकुर्लीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश , शर्मा गुरूजी , अशोक गायकवाड , महेश आणि रमेश मोकळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सुरेंद्र पाटील असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी चार संशयित आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. ठाकुर्ली चोळेगाव येथे सुरेंद्र पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे दावडी गावात पाटीदार भवन येथे कार्यालय आहे. त्यांना पाच भोंदूबाबाच्या टोळीने १० टक्के पैसे पूजेसाठी दिले तर ५० कोटीचा पाऊस पाडून देतो असे सांगितले. त्यानुसार ५६   लाखाची रक्कम सुरेंद्र यांनी तयार केली. या भोंदूबाबाच्या टोळीने शनिवारी रात्री पाटील यांच्या पाटीदार भवन कार्यालयात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा सुरू केली. पहाटेच्या सुमारास या ...

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई.

पुणे प्रतिनिधी :   अमली पदार्थ विक्रीस आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर परिसरात पकडले. त्यांच्याकडून २० किलो गांजा , दुचाकी , मोबाइल संच असा चार लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कुमार अनिल नितळे (वय ३० वर्षे ) रा. गायकवाडनगर , लोणी रेल्वे स्थानक परिसर ऋषीकेश रमेश बेले (वय २४ वर्षे) रा. इंदिरानगर , नळदुर्ग , ता. तुळजापूर , जि. उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दुचाकीस्वार नितळे आणि साथीदार बेले पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्ती परिसरात आले होते. त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २० किलो गांजा , दुचाकी , मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे , सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , मारुती पारधी , पांडुरंग पवार , राहुल जोशी , योगेश मोहिते आदींनी ही कारवाई केली.  

युवकांसाठी रविवार हा ठरला घातवार; मैत्रीचा धक्कादायक शेवट!

  स मर्थ भारत न्यूज नेटवर्क: अमरावतीमध्ये मैत्रीचा धक्कादायक शेवट झाल्याचं समोर आलं आहे. इथे दोन मित्रांचा एकत्रच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. नांदगाव पेठ धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या युवकांसाठी रविवार हा घातवार ठरला. धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बुडत असल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या युवकाने धरणात उडी घेतली. मात्र , दोघांचाही पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी येथील वाळकी धरणात घडली. मिळालेल्या माहितीनुसार , विनय शिवदास चव्हाण , ( वय २० वर्षे) , अभिषेक प्रदीप कुरळकर , ( वय २१ वर्षे) असे घटनेत मृत्यमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. अमरावती आणि रहाटगाव येथील काही युवक धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेले असतांना त्यातील अभिषेक प्रदीप कुरळकर रा. रहाटगाव हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र , पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला हे पाहून त्याठिकाणी असलेल्या विनय शिवदास चव्हाण रा. निशिगंधा कॉलनी अमरावती याने क्षणाचाही विचार न करता अभिषेकला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण दोघांचाही पाण्यात बुडून ...