मंचर प्रतिनिधी:
तु मला खूप आवडतेस असे म्हणत हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेचा विनयभंग करत तिच्या हॉटेलमधील 3 हजार रुपये चोरल्याची घटना मंचर ता.आंबेगाव येथे दिनांक २२ मे २०२२ रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे.या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गोविंद आत्माराम भरोसे सध्या रा.मंचर,ता.आंबेगाव,मूळ रा.असोला ,ता.परभणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ३८ वर्षीय महिलेने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की,दिनांक.२२ रोजी फिर्यादी महिला दुपारच्या वेळी तिच्या हॉटेलमध्ये असताना त्याठिकाणी आरोपी गोविंद आत्माराम भरोसे दारू पिऊन आला आणि त्याने हॉटेलमध्ये येऊन पीडित महिलेस तू मला खूप आवडतेस असे म्हणत तिच्या हाताला धरून तिला जवळ ओढत तिची छेडछाड केली.संबंधित महिलेने माझा हात सोड नाहीतर मोठमोठ्याने आरडाओरडा करेल असे म्हणाली असता आरोपीने महिलेस जमिनीवर ढकलून दिले व हॉटेलच्या गल्ल्यातील ३ हजार रुपये रोख रक्कम चोरली.या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गोविंद भरोसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार घोडे करत आहेत.