खेड प्रतिनिधी:
खेडमधील कडधे गावात मंगळवारी दिनांक.२४ मे २०२२ रोजी एका लग्नाच्या वरातीत दारूवरून भांडण झाले.या भांडणातूनच एका युवकाची निर्घूण हत्या करण्यात आली आहे. दोन दिवसानंतर सदर तरुणाचा मृतदेह सापडला. सहा जणांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल
याबबत अधिक माहिती अशी की, लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे
केल्याच्या वादातून कडधे येथे युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.सहा युवकांनी
मारहाण केल्यानंतर मयत युवकाला चासकमान डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून
दिले.दोन दिवसानंतर सदर तरुणाचा मृतदेह सापडला.शंकर शांताराम नाईकडे (वय. ४०वर्षे)
रा.कडधे ता.खेड असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. चास येथील बारमध्ये
वाद झाला.मात्र, भांडणे नको म्हणून त्या ठिकाणी वाद मिटवला आणि हे जण वरातीला
निघून गेले.त्या ठिकाणी शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे पिण्यासाठी
दारूची मागणी केली.नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करू
लागला.या कारणावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरु झाली.नंतर त्यांचे मारामारीत
रुपांतर झाले.शंकर याला युवकांनी एकत्रितपणे बाजूला नेले.अंधारात त्याच्यावर
चहूबाजूंनी जोरदार हल्ला चढवला,दगड विटांनी डोक्यावर मारहाण केली.मारहाणीनंतर शंकर
निपचित पडला.भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणून आरोपींनी त्याला एका वाहनात घालून
गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकून
दिले,अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
याप्रकरणी सहा जाणांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.वासुदेव बोंबले,पवन बोंबले,स्वप्नील सावंत,निलेश नाईकडे,ऋषिकेश ऊर्फ लखन
नाईकडे,विलास परसुडे अशी सर्व आरोपींची नावे आहेत.पुढील तपास पोलीस करत आहेत.