मंचर प्रतिनिधी:
मंचर ता.आंबेगाव येथून दिनांक २३ मे २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या
सुमारास पूजा तपन गायन (वय.२० वर्षे) रा.मंचर, ता.आंबेगाव येथील महिला आपल्या राहत्या
घरातून निघून गेली आहे.सदर महिला ही बेपत्ता असल्याची तक्रार तिचे पती तपन निमाय
गायन यांनी मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबबत सविस्तर वृत्त असे की,तपन निमाय गायन (वय. २९वर्षे) हे मंचर
येथे वास्तव्यास असून गेली १४ वर्षे सराफाच्या दुकानात कारागीर म्हणून काम करत
आहेत.त्यांना १ वर्षाचा मुलगादेखील आहे.२३ मे रोजी सकाळी १०वाजताच्या सुमारास
फिर्यादी कामावर गेले.त्यांची पत्नी पूजा व मुलगा निलजीत हे दोघे घरी
होते.त्यानंतर दुपारी २च्या सुमारास पूजा ह्या मुलगा निलजीत याला शेजारी राहत
असणारे नईफ तांबोळी यांच्याकडे सोडून मी पतीबरोबर शोपिंगसाठी जात आहे असे सांगून निघून
गेल्या.बराच वेळ झाला तरीही त्या घरी आल्या नसल्याने नईफ तांबोळी यांनी फिर्यादीस
फोन करून सदर झालेल्या घटनेची माहिती दिली व मुलगा रडत असल्याने लवकर घरी या असे
सांगितले.त्यानंतर फिर्यादीने पत्नी पूजा हिला फोन लावला असता तिचा फोन बंद
येत होता त्यामुळे फिर्यादीने मंचर
गावात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला
असता त्या भेटल्या नाहीत.तसेच जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे
देखील गेल्या नसल्याने त्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली.
बेपत्ता महिलेचे वर्णन:
नाव-पूजा तपन गायन (वय.२० वर्षे), अंगाने सडपातळ, उंची ५ फूट, चेहरा गोल, रंग गोरा, अंगात निळ्या रंगाची जीन्स, काळ्या रंगाचा टॉप, भाषा बंगाली, आसामी, मराठी, हिंदी बोलते.तरी वरील वर्णनाची महिला कुठे दिसल्यास मंचर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.