पुणे प्रतिनिधी:
रस्त्याने
पायी जाणाऱ्या नागरिकास भरधाव दुचाकीने धडक दिली याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी
जबर मारहाण केली.या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला
आहे.हि घटना मंगळवारी सायंकाळी कात्रज कोंढवा रस्त्यावर घडली.
याबाबत
अधिक माहिती अशी कि,अशोक राव असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी
कोंढवा पोलिस ठाण्यात दोन दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोक
राव हे बिगारी काम करत होते.मंगळवारी सायंकाळी ते कात्रज कोंढवा रस्त्याने पायी
जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या (एम एच १२ टी बी ४०२३)क्रमांकाच्या भरधाव
दुचाकीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.त्यामुळे अशोक राव यांना दुखापत
झाली.त्यावेळी त्यांनी दुचाकीस्वारांना जाब विचारला असता दुचाकीवरील तरुण आणि
त्यांच्यात वाद सुरु झाले.तरुणांनी राव यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात
केली.सदर तरुणांनी जबर मारहाण केल्यामुळे राव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली
त्यानंतर अपघात ठिकाणावरून दुचाकीस्वार
पसार झाले.नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.पोलिस घटनास्थळी दाखल
झाल्यानंतर त्यांनी राव यांना तत्काळ रुग्णालयात हलविले.मात्र राव यांचा मृत्यू
झाला होता.या प्रकरणाचा सखोल तपास कोंढवा पोलिस करत आहेत.