Skip to main content

दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाचा करण्यात आला खून.

पुणे प्रतिनिधी:

दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी एकाचा चाकूने गळा चिरून खून केला आहे.हि धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती समोरील सार्वजनिक स्वच्छातागृहासमोरील पदपथावर घडली आहे.संजय असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.प्रभातकुमार कमलाकर म्हस्के (वय.३६ वर्षे) रा.सोलापूर, निलेश बाळासाहेब भोसले (वय.२५ वर्षे) रा.वेल्हे, शिवापूर असे खून केलेल्या आरोपींची नावे आहेत.या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संजय, निलेश आणि प्रभातकुमार हे तिघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.तिघे मिळेल ते कामे करून फुटपाथवर राहत होते.सोमवारी प्रभातकुमार याला केटरिंगच्या कामाचे १६०० रुपये मिळाले होते.तिघांनी मध्यरात्री एकत्र येऊन दारू प्यायले.

संजय याने पुन्हा दारू पाजण्याचा आग्रह केल्यामुळे त्यांनी पुन्हा मद्यप्राशन केले.त्यानंतर तिघे रेल्वेस्थानकाकडे निघाले होते.संजय याने प्रभातकुमार याच्याकडे पैशाची मागणी केली.मात्र पैसे संपल्यामुळे त्याने पैसे देण्यास नकार दिला.त्यावेळी त्यांच्यात वाद झाले त्यातून संजय याचा आंबा कापण्याच्या छोट्या चाकूने गळा कापला.खून केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता.सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सूरूवात केली.व्यक्ती झालेला अज्ञात होता.

पोलिसांसमोर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याबरोबरच आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान होते दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता,मृत व्यक्ती व दोघे आरोपी एकत्र जात असल्याचे दिसून आले.त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे,गुन्हे निरीक्षक उल्हास कदम,सहाय्यक निरीक्षक संदीप जोरे, कर्मचारी सुशील लोणकर,संतोष काळे,निलेश साबळे,हेमंत पेरणे यांच्या पथकाने विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले.त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी चाकूने गळा कापून खून केल्याची माहिती दिली.




पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...