मंचर प्रतिनिधी:
नारायणगाव
रोडला टेम्पोचा ज्युपिटर गाडीला धडक देऊन अपघात झाला आहे.अपघात झाल्यानंतर टेम्पो
चालक अपघात स्थळावरून पसार झाला असून पोलीस टेम्पो चालकाचा तपास करत आहे.
याबाबत
सविस्तर वृत्त असे की,दिनांक ७ मे २०२२ रोजी ६ वाजताच्या सुमारास जाधववाडी,ता.आंबेगाव,याठिकाणी
फिर्यादी ओमकार सुदाम शिंदे ( वय.२४ वर्षे) यांचे वडील सुदाम रखमा शिंदे (वय.५४
वर्षे) व आई प्रभा सुदाम शिंदे (वय.४९ वर्षे) हे दाम्पत्य मंचर बाजूकडून कारफाटा
रोड नारायणगाव बाजूकडे जात असताना अशोक लेलंड कंपनीचा दोस्त टेम्पो क्रमांक MH 14/JL/5021 वरील अज्ञात
चालकाने रहदारीचा नियम मोडून ज्युपिटर मोटार सायकलला धडक देऊन पसार झाला
आहे.टेम्पो चालक निष्काळजीपणाने अतिघाई करून वाहन चालवत होता. त्याने बाजूने
येणाऱ्या वाहनाचा अंदाज न घेता अपघात केला.या अपघातात दोन्ही शिंदे दाम्पत्यास
गंभीर जखम झाली आहे.फिर्यादीच्या वडिलांना डाव्या बाजूच्या बरगडीला फ्रॅक्चर
होऊन डाव्या खांद्याला आणि उजव्या पायाला दुखापत झाली आहे तसेच आईला उजव्या पायाला
फ्रॅक्चर होऊन पायाला दुखापत झाली आहे.आणि मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे.अपघात
घडल्याठिकाणी टेम्पो चालक जखमी दाम्पत्याला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न
करता पळून गेला आहे.
पुढील
तपास घोडेगाव पोलीस करत आहेत.