घोडेगाव प्रतिनिधी:
घोडेगाव
पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारोडी रा.हुले स्थळ नंबर.१, ता.आंबेगाव,जि.पुणे
येथे शेताच्या बांधावर शेतीच्या वादातून नामदेव कोंडीबा हुले (वय .५७ वर्षे) यांना
त्यांच्या भावाने खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना दिनांक.१८ मे २०२२ रोजी
घडली आहे.याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत
पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी नामदेव हुले हे दिनांक.१८ रोजी
नारोडी गावच्या हद्दीत हुले स्थळ येथे शेताच्या बांधावरून शेळ्या घेऊन जात असताना
त्यांचा भाऊ सोपान हरिभाऊ हुले यांनी मि शेत नांगरले आहे तुयेथून जायचे नाही आणि
तुला काय करायचे कर अशी धमकी देत लाथा
बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच भाऊ दत्तात्रय कोंडीबा हुले,पुतणे शुभम दत्तात्रय
हुले,अमोल सोपान हुले,शोभा सोपान हुले,सारिका अमोल हुले,सर्वजण रा.हुलेस्थळ
नारोडी,ता.आंबेगाव यांनी फिर्यादीस खाली पाडून लाथा बुक्य्यांनी मारहाण
केली.त्यावेळी सोपान हुले याने हातातील खोऱ्याच्या लाकडी दांड्याने फिर्यादीस
मारहाण केली आहे.त्यावेळी फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेली असता
तिलादेखील धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली.यावेळी फिर्यादीस पुन्हा शेतात
दिसलास तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली आहे.
याबाबत
नामदेव कोंडीबा हुले यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पुढील
तपास पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार यादव करत
आहेत.