नागपूर प्रतिनिधी: नागपूर शहरातील अंबाझरी तलावात एका वकिलाने उडी घेत स्वतःचे आयुष्य संपवले आहे.चंदननगर येथील प्रवीण केशवराव तपासे असे मृत वकिलाचे नाव आहे.प्रवीण तपासे हे काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे बोलले जाते. डिप्रेशनमध्ये असल्यामुळे ते कोणाशीच बोलत नव्हते.तसेच त्यांच्यावर मोठे कर्जही असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये.प्रवीण हे वकिली जास्त चालत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये आले.त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.२६ मे २०२२ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,तपासे हे जिल्हा न्यायालय परिसरात नोटरी आणि कोर्टाची कामे करायचे.कोरोना काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यानंतर त्यांची तब्येत नेहमी खराब राहायची एकीकड व्यवसाय चालायचा नाही तर दूसरीकडे आरोग्य साथ देत नव्हते.त्यातून त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला होता.रोज सायंकाळी ते फिरायला जायचे आणि रात्री साडेनऊपर्यंत घरी येत होते.बुधवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे फिरायला घराबाहेर गेले.मात्र,रात्री बराच उशीर झाल्यावरही ते परतले नाहीत.त्यावेळी त्यांनी अंबाझरी तलावात उ...
समर्थ भारत माध्यम समूह