समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
राज्यातील
अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. अहमनगर- सोलापूर महामार्गावर गुरुवारी
रात्री भीषण अपघात झाला. तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जीव गेला
आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहे. मालवाहतूक करणारा एक ट्रक, एक रीक्षा, क्रूझर जीप आणि टू व्हिलर गाडी यांच्या
धडक होऊन विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीप आणि ट्रक
यांच्यासह रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय. चार वाहनांच्या विचित्र अपघातात कृष्णा
मल्हारी बोरुडे आणि सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झालाय. तर जखमी झालेल्या
इतर दहा जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. नगर-सोलापूर
रोडवरच्या कोकणगावच्या शिवारात बोराडे वस्तीजवळ हा अपघात घडला. या अपघातानंतर
स्थानिकांनी तत्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेत मदतीचा हात दिलाय.
नगर-सोलापूर
महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती इथून एक मालवाहू ट्रक जात होता. हा
ट्रक सोलापूरहून नगरच्या दिशेनं निघालेलं. तर इतर वाहनं नगरहून सोलापरूच्या दिशेनं
जात होती. मालवाहून ट्रकनं क्रूझर आणि ऍपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या रिक्षा
रस्त्यावर पलटली. तर क्रूझरला दिलेल्या धडकेत गाडीचंही मोठं नुकसान झालंय. या
अपघातात 25 वर्षीय तरुण कृष्णा मल्हारी बोरुडे याच्यासह सोपान दिनकर जागीच ठार
झाले होते. तर गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना तत्काल रुग्णालयात उपचारासाठी नगरला
आणण्यात आलं.
राज्यात गेले
काही दिवस सातत्यानं अपघाताच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली आहे. राज्यातील
अपघातात रस्ते बळींचीही संख्या चिंतजनक आहे. रात्रीच्या वेळीस बेदरकारपणे वाहनं
चालवून किंवा वाहनांवरील नियंत्रण सुटून होत असलेल्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण
जात असल्याचं अधोरेखित झालंय. त्यामुळे काळजी व्यक्त केली जाते आहे.